शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरीसाठी दुसऱ्या दिवशीही भूसर्वेक्षण सुरु, अटक केलेल्या लोकांचा जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 12:03 IST

रिफायनरी प्रकल्प ज्या जागेत उभा केला जाणार आहे, तेथील मातीचे परीक्षण करण्यासाठी खोदकाम सुरू आहे

रत्नागिरी : कोणताही अडथळा न येता बुधवारी बारसू येथील नियोजित रिफायनरी प्रकल्पासाठीच्या भू-सर्वेक्षणाचे काम सुरू होते. दुसऱ्या बाजूला ठाकरे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी बारसू येथे जाऊन आंदोलकांची भेट घेतली. ठाकरे शिवसेना आंदाेलकांच्या पाठीशी असल्याचे सांगत त्यांनी शिंदे सरकारवर कडाडून टीका केली. मंगळवारी अटक केलेल्या ११० लोकांचा जामीन बुधवारी राजापूर न्यायालयात मंजूर झाला आहे.रिफायनरी प्रकल्प ज्या जागेत उभा केला जाणार आहे, तेथील मातीचे परीक्षण करण्यासाठी खोदकाम सुरू आहे. मंगळवारी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर दुपारच्या सत्रात हे खोदकाम सुरू झाले आहे. बुधवारीही हे खोदकाम सुरू होते. त्यात कोणताही अडथळा आलेला नाही.

बारसूतील काही स्थानिक ग्रामस्थ सर्वेक्षण स्थळानजीकच्या माळरानावर अजूनही थांबून आहेत. माळरानावर एका झाडाखाली सर्वांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. बुधवारी सकाळी खासदार विनायक राऊत, कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी बारसू येथे भेट दिली. त्यांच्यासोबत ठाकरे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी प्रकल्पस्थळी जाणार असल्याचे समजल्यानंतर रत्नागिरी शहर पोलिसांनी जिल्हाप्रमुख चाळके, तालुकाप्रमुख प्रदीप तथा बंड्या साळवी, प्रमोद शेरे यांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटीस दिल्या. मात्र तरीही हे पदाधिकारी रत्नागिरीतून बारसूकडे रवाना झाले.बारसू सर्वेक्षण स्थळापासून पाच किलोमीटर आधीच धारतळे येथे ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ताफा अडवण्यात आला. पोलिसांशी झालेल्या चर्चेनंतर खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक या दोघांच्याच वाहनांना पुढे जाऊ देण्यात आले. माळरानावर बसलेल्या ग्रामस्थांशी खासदार राऊत यांनी संवाद साधला आणि ठाकरे शिवसेना लोकांसोबत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर कडाडून टीका केली. दडपशाहीचा वापर करून प्रकल्प पुढे रेटण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

आमदार राजन साळवी यांचे समर्थन

ठाकरे शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी सोमवारी आंदोलनाची सुरुवात झाल्यापासूनच मौन बाळगून होते. बुधवारी सकाळी त्यांनी ‘कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यासाठी प्रकल्पाचे समर्थनच’ असे ट्वीट केले. विरोध करणाऱ्यांना प्रशासनाने प्रकल्पाची बाजू पटवून द्यावी, असे आवाहनही त्यांनी यातून प्रशासनाला केले आहे.

विनायक राऊत यांची सारवासारवआमदार राजन साळवी यांच्या ट्वीटबाबत प्रतिक्रिया देताना खासदार राऊत म्हणाले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रिफायनरीबाबत जी भूमिका घेतील, तीच आपल्याला मान्य असेल असे राजन साळवी यांनी आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे यात प्रतिक्रिया देण्यासारखे काही नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पPoliceपोलिसagitationआंदोलन