शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

नव्याकोऱ्या मांडवी एक्स्प्रेसला बिघाडाचे ग्रहण, सतत एसी बंद पडल्याने प्रवासी हैराण 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 5:49 PM

आज मडगावहून मुंबईकडे येत असलेल्या मांडवी एक्स्प्रेच्या एसी कोचमधील एसी सातत्याने बिघडत असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे. 

रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मांडवी आणि कोकणकन्या या गाड्या सोमवारपासून नव्या रूपात धावू लागल्या आहेत. बदलेले डबे आणि रंगरूप यामुळे गाड्यांच्या या नव्या रूपाची चर्चा सुरू आहे. मात्र या नव्याकोऱ्या गाडीला दुसऱ्याच दिवशी बिघाडाचे ग्रहण लागले असून, आज मडगावहून मुंबईकडे येत असलेल्या मांडवी एक्स्प्रेच्या एसी कोचमधील एसी सातत्याने बिघडत असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे. 

आज सकाळी मडगाववरून मांडवी एक्स्प्रेस रवाना झाल्यानंतर तिच्या एसी डब्यांमधील एसीमध्ये सातत्याने बिघाड निर्माण झाला. प्रत्येक एसी डब्यातील डीसी ट्रीप होत असल्याने एसी बंद होत आहेत. राजापूर, रत्नागिरी, चिपळून, खेडदरम्यान चार वेळा एसी बंद पडल्याचे प्रवाशांनी सांगितले. तसेच सतत एसी बंद पडत असल्याने प्रवाशांची घुसमट होत असून, अनेक प्रवासी उकाड्याने हैराण झाले आहेत. त्याशिवाय कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसच्या डब्यांची रचना बदलल्याने ट्रेन स्टेशनवर आल्यानंतर सर्व डबे त्यांच्या निर्धारित स्थळापासून पुढे किंवा मागे थांबत आहेत. त्यामुळे प्रवाशांची धावपळ होत आहे. तसेच पँट्री कारमध्ये पारंपरिक गॅसऐवजी हीटर ठेवण्यात आल्याने नाश्ता तयार करण्यास उशीर होत आहेत. दरम्यान, या प्रकरणी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.कोकण रेल्वेने या दोन्ही एक्सप्रेस गाड्यांचे रुप पावसाळ्यात बदलण्याचे ठरविले होते. त्यानुसार आधीच्या निळ्या रंगातील इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नाईच्या या गाड्यांच्या बोगीऐवजी आता प्रवासी क्षमता अधिक असलेल्या व लाल-करड्या रंगातील लिके होल्फमन बूश बोगी जोडल्या गेल्या आहेत.. या गाड्यांमध्ये अत्याधुनिक प्रसाधनगृहे, आरामदायी बैठक व्यवस्था आहे. एलएचबी डब्यांच्या शयनयान बोगींमध्ये ७२ ऐवजी ८० प्रवासी झोपू शकणार आहेत. एसी थ्री टायर श्रेणीतील बी १ ते बी ५ या बोगींमधील प्रवासी क्षमताही ६४ ऐवजी ७२ होणार आहे. एसी २ टायरमध्ये ५४ व एचए १ मध्ये २४ प्रवासी क्षमता असेल. त्यामुळे कोकणकन्यामध्ये १२४ तर मांडवी एक्सप्रेसमध्ये ९४ प्रवासी क्षमता वाढली आहे. दरम्यान, निळ्या रंगाऐवजी लाल व करड्या रंगाचा साज श्रुंगार करून या दोन्ही गाड्या १० जून ते ३१ आॅगस्ट २०१९ दरम्यान कोकण रेल्वे मार्गावरून धावणार आहेत. त्यानंतर गाड्या नियमित होतील.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे