शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

कोकणच्या सुपुत्राला बॉलिवूडचा 'कॉल'; प्रणय शेट्येचं नाव मोठ्या पडद्यावर झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 19:30 IST

कोकणवासियांसह मुंबईकर चाकरमान्यांच्या ओठांवर रुळलेल्या 'कोकण कोकण' या गाण्याचा गीत-संगीतकार प्रणय शेट्येचे नाव हिंदी सिनेसृष्टीत दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.

तळेरे- 

कोकणवासियांसह मुंबईकर चाकरमान्यांच्या ओठांवर रुळलेल्या 'कोकण कोकण' या गाण्याचा गीत-संगीतकार प्रणय शेट्येचे नाव हिंदी सिनेसृष्टीत दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. आगामी एका हिंदी सिनेमाच्या प्रकल्पासाठी त्याला विचारणा झाल्याची खात्रीलायक बातमी मिळते आहे. त्यामुळे कोकणातील आणखी एक चेहरा लवकरच भारतीय सिनेसृष्टीत झळकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

कोकणाचं वर्णन करणारी अनेक गाणी आजपर्यंत डिजीटल माध्यमांवर उपलब्ध आहेत. 'गोमू माहेरला जाते हो नाखवा', 'कोकणची चेडवा' या गीतांनंतर आता द्रौपदी क्रिएशन निर्मित 'कोकण कोकण' या अजरामर गीतानं रसिकप्रेक्षकांच्या हृदयाचा ताबा घेतला आहे. विशेष म्हणजे, या गाण्याचं लोकार्पण कोकण रेल्वेत प्रवाशांच्या हस्ते करण्यात आलं होतं.

हे गाणे तरूणाईत प्रसिद्ध असलेल्या शुभांगी केदार व ए. आर. रेहमान यांचा पट्टशिष्य सार्थक कल्याणी यांनी गायले आहे. या गीताचे दिग्दर्शन सिद्धांत सरफरेने केले असून चिन्मय जाधव याने सिनेमॅटोग्राफी व सहदिग्दर्शनाची भुमिका बजावली आहे. या गीतात सागर कदम व रुचिता शिर्के या नव्या दमाच्या कलाकारांनी उत्तम काम केले आहे. आणि या संपुर्ण गिताचे चित्रीकरण सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेले आहे. या प्रकल्पानंतर लवकरच अधिकाधिक कोकणातील कलाकरांना घेऊन हळदी विशेष गाणे चित्रीत करणार असल्याचे द्रौपदी क्रिएशनतर्फे कला दिग्दर्शक ओमकार सावंत यांनी जाहीर केले आहे.

प्रणय कणकवली तालुक्यातील शिडवणेचागीतकार-संगीतकार प्रणय शेट्ये याने अनेक गीते शब्दबध्द केली आहेत. त्यातील पहिल्या लॉकडाऊन मध्ये केलेले उभारी गीत आणि अलिकडचे कोकण कोकण हे गीत प्रचंड गाजले. प्रणय हा कणकवली तालुक्यातील शिडवणे येथील असून कोकण कोकण या गिताचे संपुर्ण चित्रीकरण जिल्ह्यात विविध ठिकाणी झाले आहे. 

कोकण कोकण ह्या बहुचर्चित प्रकल्पानंतर प्रणय शेट्ये आणि टीमसाठी अनेक नविन संधी निर्माण झाल्या आहेत. प्रणय सध्या तीन महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करत असून एका हिंदी निर्मात्याने देखील सिनेमातील गीतलेखन, संगीतासाठी विचारणा केल्याचे नुकतेच कळते आहे. हा प्रकल्प २०२४ पर्यंत पूर्णत्वास जाणार असून याबाबत प्रणय शेट्ये यांस विचारले असता, "नव्या प्रकल्पांवर काम चालू आहे हे खरे आहे. मात्र प्रकल्प पूर्णत्वास जात नाही तोवर कुठलेही भाष्य करणे योग्य नाही! कोकणभूमीने दिलेल्या आशीर्वादामुळे अनेक संधी चालून येतायत ही एक कलाकार म्हणून आनंदाची बाब आहे. पण आता जबाबदारी वाढलीय कारण मायबाप रसिकप्रेक्षकांच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत." असे प्रणय याने सांगितले. यानिमित्ताने कोकणातील एक कलाकार भारतीय सिनेसृष्टीत पदार्पण करणार या चर्चेने कोकण कोकण हे गाणं पुन्हा चर्चेत आलंय.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKankavliकणकवलीbollywoodबॉलिवूड