खेर्डी सरपंचाविरोधात अविश्वास ठराव पारित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 13:11 IST2019-06-13T13:11:05+5:302019-06-13T13:11:41+5:30
खेर्डी सरपंचाविरोधात अविश्वास ठराव पारीत झाला. ग्रामपंचायतीत बुधवारी झालेल्या विशेष सभेत १३ विरुद्ध २ मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला. १७ पैकी दोन सदस्य अनुपस्थित राहिले. अविश्वास ठरावाच्या बाजूने १३, तर २ सदस्यांनी विरोधी मतदान केले.

खेर्डी सरपंचाविरोधात अविश्वास ठराव पारित
चिपळूण : खेर्डी सरपंचाविरोधात अविश्वास ठराव पारीत झाला. ग्रामपंचायतीत झालेल्या विशेष सभेत १३ विरुद्ध २ मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला. १७ पैकी दोन सदस्य अनुपस्थित राहिले. अविश्वास ठरावाच्या बाजूने १३, तर २ सदस्यांनी विरोधी मतदान केले.
सरपंच विरोधी अविश्वास सहमत होताच विरोधकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. तहसीलदार जीवन देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी ११ वाजता सभेला सुरुवात झाली.
सभेला एकूण १५ सदस्य उपस्थित होते. सुरुवातीला अविश्वास दाखल केलेल्या ठरावाची तहसीलदारांनी प्रोसिडिंगवर सह्या घेत खात्री केली. त्यानंतर अविश्वास ठरावाचे वाचन झाले. दशरथ दाभोळकर यांनी सरपंच विरोधी अविश्वास ठराव मांडला. त्याला विश्वनाथ फाळके यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर प्रकाश पाथरवट, प्रकाश साळवी यांनी चर्चेद्वारे आपली मते मांडली. सरपंच जयश्री खताते यांनी आपले मत मांडले. शेवटी अविश्वास ठरावावर हातवर करून मतदान झाले. अविश्वास ठरावाच्या बाजूने १३, तर विरोधीत २ मते पडली.
सभेला झरिना चौगुले व नया शिगवण हे दोन सदस्य अनुपस्थित होते. जयश्री खताते, प्रियंका भुरण यांनी अविश्वास विरोधी मतदान केले. ठरावाच्या बाजूने प्रकाश साळवी, प्रकाश पाथरवट, दशरथ दाभोळकर, विश्वास फाळके, सुनील दाते, देविका डिके, विकल्पा मिरगल, अवंतिका खरावते, विनिता मोहिते, प्राची शिर्के, गजानन जाधव, विनय दाते, प्रसाद सागवेकर यांनी मतदान केले.