Khed Nagar Parishad Election Result 2025: जवळपास १४ वर्षानंतर खेड नगरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता आली आहे. खेड नगर परिषदेतील सर्व २१ नगरसेवक महायुतीचे विजयी झाले आहेत. नगराध्यक्षही महायुतीचा निवडून आला आहे. सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो. शिवसेनेवर जो विश्वास दाखवला आहे, तो पुढील पाच वर्षात चांगली कामे करून सार्थ ठरवून दाखवू. रामदास कदम यांची दूरदृष्टी आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांची मेहनत, शिवसैनिकांची मेहनत यामुळे महायुतीच्या २१ पैकी १७ नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले आहेत. नगराध्यक्ष शिवसेनेचा निवडून आलेला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघातील मुख्य शहर असलेल्या खेड नगरपरिषदेत एकहाती विजय मिळाला आहे. शिंदेसेना भाजपा युतीने नगराध्यक्ष पदासाह सर्व वीस नगरसेवक निवडून आणून विरोधकांचा धुव्वा उडवला. नगराध्यक्ष पदासाठी युतीच्या उमेदवार माधवी बुटाला यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी टिकवून ठेवत तब्बल २१११ मतांनी विजय मिळवला. त्यांच्या विरोधात उद्धव सेनेच्या उमेदवार सपना कानडे यांना ३१९५ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या सीमा शिंदे यांना अवघी ९९ मते मिळाली. नगरसेवक पदासाठी २० जागांसाठी ४६ उमेदवार रिंगणात होते. मात्र, युतीमधील शिंदे सेनेचे सरवं १७ विजयी झाले तर भाजपाचे ३ उमेदवार विजयी झाले. विरोधकांना या निवडणुकीत एकही जागा मिळवता आली नाही.
कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी
१४ वर्षांपूर्वी रामदास कदम खेड नगर परिषदेचे नेतृत्व करत होते, तेव्हा १०० टक्के निकाल शिवसेनेच्या बाजूने लागत असे. याचीच पुनरावृत्ती पुन्हा १४ वर्षांनंतर होताना दिसत आहे. यातून एकच सिद्ध होते की, खेड हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आजही आहे आणि उद्याही राहील. किंबहुना कोकणात जो विजय प्राप्त होत आहे, तो महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुकांची नांदी आहे. शिवसेनेचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जनतेने आणि शिवसैनिकांनी दाखवलेला हा विश्वास आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीच्या विजयाची नांदी ही कोकणातून सुरू झालेली आहे आणि त्याचा परिणाम नक्कीच दिसेल, असा विश्वास योगेश कदम यांनी व्यक्त केला.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण हेही शिवसेनेचेच बालेकिल्ले आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सर्व विजयी उमेदवारांचे मनापासून अभिनंदन करतो. रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की, होय कोकण आणि शिवसेना हे समीकरण कधीही तुटणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालणारा कोकणतील शिवसैनिक आहे. मुंबईतील निवडणुकीतही अशाच प्रकारच्या विजयाची पुनरावृत्ती हाच शिवसैनिक करून दाखवेल, असे योगेश कदम म्हणाले.
Web Summary : Shinde faction's victory in Khed signifies continued Shiv Sena dominance in Konkan. Yogesh Kadam predicts this win foreshadows success in Mumbai's upcoming municipal elections, crediting Eknath Shinde's leadership and public trust.
Web Summary : खेड़ में शिंदे गुट की जीत कोंकण में शिवसेना के निरंतर प्रभुत्व का प्रतीक है। योगेश कदम ने भविष्यवाणी की कि यह जीत मुंबई के आगामी नगर निगम चुनावों में सफलता का संकेत देती है, जिसका श्रेय एकनाथ शिंदे के नेतृत्व और जनता के विश्वास को जाता है।