चिपळूण : शहरातील रंगोबा साबळे परिसरात २६ लाख रुपये किमतीचा गुटखा चिपळूण पोलिसांनी पकडल्यानंतर याचे थेट कनेक्शन कर्नाटकपर्यंत पोहोचले आहे. याप्रकरणी मुख्य वितरक बेळगाव - निपाणी येथील असल्याची माहिती पुढे आली आहे.गुटखा प्रकरणी यापूर्वी अटक केलेल्या तिघांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. भूषण श्रीकृष्ण शिरसाट ( ५३ , बांदा सावंतवाडी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. यापूर्वी या गुटखा प्रकरणी मुश्ताक जिकर कच्छी , अंकुश सुनील केसरकर , संदीप भैरू पाटील या तिघांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील रंगोबा साबळे मार्गालगतच्या नजराना अपार्टमेंट परिसरात आयशर टेम्पो व मारुती इको या दोन वाहनात गुटखा भरुन तो विक्रीच्या उद्देशाने घेऊन जात असताना पोलिसांनी धाड टाकून वाहनासह २६ लाख ९ हजार १५० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे.गुटखा प्रकरणाची पाळेमुळे शोधण्याच्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर त्यांच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी मुश्ताक कच्छी याची चौकशी केल्यानंतर त्याने हा गुटखा कर्नाटक व गोवा येथून आणल्याची माहिती दिली होती. शिरसाट याला मंगळवारी येथील न्यायालयात हजर केले असता त्याला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानुसार गुरुवारी त्याला हजर केले जाणार आहे.पोलिसांनी आता गुटखा प्रकरणाचे फास अधिकच आवळले असून, या प्रकरणाशी संबंधित असलेल्या कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरवण्यात आली आहेत.मोक्काअंतर्गत कारवाई अशक्य : पोळकर्नाटकमध्ये गुटख्याला बंदी नसल्याने त्याचा या व्यावसायिकांनी फायदा उठवला असून, बेळगाव येथील मुख्य वितरकापर्यंत पोहोचण्यात यश आले आहे. त्याची माहिती घेतली जात आहे. दरम्यान संबंधित आरोपी हे सांघिक गुन्हेगारीत असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई अशक्य असल्याचे मत पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी स्पष्ट केले.
गुटखा प्रकरणाचे कर्नाटक कनेक्शन, चौकशी सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 15:12 IST
chiplun, crimenews, karnatka, belgoan, kolhapunrews, police चिपळूण शहरातील रंगोबा साबळे परिसरात २६ लाख रुपये किमतीचा गुटखा चिपळूण पोलिसांनी पकडल्यानंतर याचे थेट कनेक्शन कर्नाटकपर्यंत पोहोचले आहे. याप्रकरणी मुख्य वितरक बेळगाव - निपाणी येथील असल्याची माहिती पुढे आली आहे.
गुटखा प्रकरणाचे कर्नाटक कनेक्शन, चौकशी सुरूच
ठळक मुद्देमुख्य वितरक बेळगाव-निपाणी येथील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचणार