शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जाखडी नृत्याचा वसा जपण्याचा ध्यास

By admin | Updated: November 15, 2015 23:55 IST

लांजा तालुका : नृत्य स्पर्धेत मल्लिकार्जून गणेशकृपा नाच मंडळाचे यश

अनिल कासारे-- लांजा --व्यवसायाने फोटोग्राफर... मात्र पारंपरिक जाखडी कलेचा वारसा लाभलेल्या गवाणे येथील रवींद्र उर्फ पिंट्या आकाराम कोटकर या युवकाला जाखडी नृत्याची कला स्वस्थ बसू देत नव्हती. गवाणे रेवाळेवाडी येथील आपल्या मित्रांना सोबत घेऊन त्यांनी मल्लिकार्जून गणेशकृपा नाच मंडळाची निर्मिती केली. नुकत्याच घेण्यात आलेल्या जाखडी नृत्य स्पर्धेत प्रथमच पदार्पण करत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.रवींद्र कोटकर हा लहानपणापासून आपल्या मामांच्या गावाला असल्याने त्याचे शिक्षण देखील गवाणे येथेच झाले आहे. त्याचे आजोबा सद्गुरु शाहीर गोविंद राघो तटकरे व मामा शाहीर गजानन मारुती तटकरे यांच्या नाच मंडळामध्ये वयाच्या ५व्या वर्षापासून नृत्य कलाकार म्हणून सहभागी झाला. त्यानंतर मामा व आजोबा यांच्या गाण्यांना तो कोरस देत त्याने आपल्या आवाजाचा करिश्मा दाखवायला सुरुवात केली. यात त्याला गणेश गोपाळे, प्रशांत कोटकर यांनी भक्कम साथ दिली आहे.नुकतेच कुवे येथे कलगी - तुरा उन्नती समाज मंडळ, लांजा संलग्न राजापूर - रत्नागिरी यांच्यावतीने जाखडी नृत्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये त्यांनी यश मिळविले. शाहीर गजानन तटकरे, शाहीर तुषार पंदेरे यांनी त्याला मार्गदर्शन केले.बाबूरंगले घराण्यातील शीघ्र कवी वासुवाणी यांचे शिष्य गोविंद, विश्राम यांचे शिष्य सखाराम, मारुती यांचे भिकाजी, तुकाराम यांचे शिष्य बाळू, रामचंद्र यांचे शिष्य गजानन, विश्वनाथ यांचे शिष्य शाहीर रवींद्र आकाराम कोटकर यांच्यासह गणेश कृष्णा गोपाळे, प्रशांत कोटकर, प्रशांत शिंदे, प्रकाश तटकरे, यशवंत रेवाळे, मोहिते व नृत्य कलाकार मुले यांचा मोलाचा वाटा आहे.