जीवितहानी टाळण्यासाठी सजगतेने सामोरे जाणे आवश्यक : चंद्रकांत सूर्यवंशी

By शोभना कांबळे | Updated: October 13, 2023 18:36 IST2023-10-13T18:35:44+5:302023-10-13T18:36:38+5:30

रत्नागिरी : आपत्ती येण्यापूर्वी निसर्ग संकेत देतो. त्याच्याकडे पाहिले पाहिजे. शिवाय त्याबाबत अमलबजावणीही करायला हवी. सजगतेने, एकदिलाने, एकमेकांचे हात ...

It is necessary to deal with caution to avoid loss of life says Chandrakant Suryavanshi | जीवितहानी टाळण्यासाठी सजगतेने सामोरे जाणे आवश्यक : चंद्रकांत सूर्यवंशी

जीवितहानी टाळण्यासाठी सजगतेने सामोरे जाणे आवश्यक : चंद्रकांत सूर्यवंशी

रत्नागिरी : आपत्ती येण्यापूर्वी निसर्ग संकेत देतो. त्याच्याकडे पाहिले पाहिजे. शिवाय त्याबाबत अमलबजावणीही करायला हवी. सजगतेने, एकदिलाने, एकमेकांचे हात धरुन येणाऱ्या आपत्तीला सामोरे गेल्यास जीवितहानी टाळू शकतो, असे मत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अधिकारी कर्मचारी यांनी शपथ घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी ही शपथ दिली. निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी आपत्ती म्हणजे काय, याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, येणाऱ्या आपत्तीविषयी नेहमीच सजग रहायला हवे. विविध आपत्तींची माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी वाचन वाढविले पाहिजे. यातून आपले अनुभव समृद्ध होतील. सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीबाबत खात्री करावी. त्यावर येणारी माहिती खोटी असेल, तर ते विसरायला हवे. खरी असेल, तर त्यावर मात कसे करता येईल, याचा विचार करायला हवा, असे त्यांनी सांगितले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड म्हणाले की, संयुक्त राष्ट्र संघाने आजचा दिवस जाहीर केला आहे. डब्लूएचओने मानवी प्रजातीला असणाऱ्या १० धोक्यांची यादी बनविली आहे. यात प्रथम क्रमांकावर पर्यावरण बदलाचा मुद्दा आहे. आपत्ती व्यवस्थापनात मन लावून काम करणे हे अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे यांनीही अनुभव कथन करुन ‘मॉक ड्रिल’ घेण्याबाबत सूचना केली. यावेळी सर्वसाधारण शाखेच्या उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, विशेष भूसंपादन अधिकारी निशाताई कांबळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, तहसीलदार हणमंत म्हेत्रे, जिल्हा आपत्ती निवारण अधिकार अजय सूर्यवंशी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: It is necessary to deal with caution to avoid loss of life says Chandrakant Suryavanshi