शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

रत्नागिरी : चिपळुणात दशावतार नाट्य महोत्सवाला प्रारंभ, पहिल्या दिवशी दुर्वास भोजनला उत्साही प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 3:24 PM

चिपळूण येथील पवन तलाव मैदानावर सुरु असलेल्या दशावतार नाट्य महोत्सवात पहिल्या दिवशी ओंकार दशावतारी नाट्यमंडळ, कसाल (ता. कुडाळ) यांचा दुर्वास भोजन हा रामायणावर आधारित नाट्यप्रयोग कलाप्रेमींची दाद मिळवून गेला. या महोत्सवाला पहिल्या दिवशी चिपळूणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने उर्वरित कालावधीतही येथील कलाप्रेमींचा या महोत्सवाला मोठा प्रतिसाद लाभणार आहे.

ठळक मुद्देचिपळुणात दशावतार नाट्य महोत्सवाला प्रारंभ पहिल्या दिवशी दुर्वास भोजनला उत्साही प्रतिसाद

चिपळूण : येथील पवन तलाव मैदानावर सुरु असलेल्या दशावतार नाट्य महोत्सवात पहिल्या दिवशी ओंकार दशावतारी नाट्यमंडळ, कसाल (ता. कुडाळ) यांचा दुर्वास भोजन हा रामायणावर आधारित नाट्यप्रयोग कलाप्रेमींची दाद मिळवून गेला. या महोत्सवाला पहिल्या दिवशी चिपळूणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने उर्वरित कालावधीतही येथील कलाप्रेमींचा या महोत्सवाला मोठा प्रतिसाद लाभणार आहे.सांस्कृतिक कार्यमंत्री तथा शालेय शिक्षणमंत्री, कोकणचे सुुपुत्र विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम दिनांक २२ जानेवारीपर्यंत दररोज सायंकाळी ६.३० वाजता सुरु होणार आहे. आमदार सदानंद चव्हाण व नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले.

यावेळी ओंकार दशावतारचे संचालक विजय वाडकर, लोककला अनुदानचे सदस्य तुषार नाईक, दशावतारचे ज्येष्ठ कलावंत डी. के. तांबे यांचा सत्कार करण्यात आला. दशावतार या कलेबाबत ज्यांनी संशोधन केले, त्या डॉ. तुलशी बेहरे यांनाही यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली.१९ रोजी आरोलकर पारंपरिक दशावतारी नाट्यमंडळ, आरवली यांचा वृंदा जलधर हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. २० रोजी बाबी नालंग दशावतारी नाट्यमंडळ, ओसर, (ता. कणकवली) यांचा ह्यभीमाशंकरह्ण हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार होणार आहे.

२१ रोजी गुरुकृपा दशावतारी लोककला नाट्यमंडळ, हळवल, (ता. कणकवली) यांचा हुंडलासूर हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. २२ रोजी ओम विरभद्र दशावतार नाट्यमंडळ, भांडूप (प.), मुंबई यांचा पावन झाली कोकणभूमी हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcultureसांस्कृतिक