सहकारी संस्थांच्या नोंदणीची माहिती, कागदपत्रांची यादी एका क्लिकवर मिळणार

By शोभना कांबळे | Updated: May 27, 2025 18:31 IST2025-05-27T18:30:56+5:302025-05-27T18:31:10+5:30

शोभना कांबळे रत्नागिरी : नागरिकांसाठीही आठ प्रकारच्या सहकारी संस्थांच्या नोंदणीचे निकष, त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी आणि आदर्श उपविधी यांची ...

Information on registration of cooperative societies list of documents will be available with one click | सहकारी संस्थांच्या नोंदणीची माहिती, कागदपत्रांची यादी एका क्लिकवर मिळणार

सहकारी संस्थांच्या नोंदणीची माहिती, कागदपत्रांची यादी एका क्लिकवर मिळणार

शोभना कांबळे

रत्नागिरी : नागरिकांसाठीही आठ प्रकारच्या सहकारी संस्थांच्या नोंदणीचे निकष, त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी आणि आदर्श उपविधी यांची माहितीही अगदी घरबसल्या व्हावी, या उद्देशाने जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डाॅ. सोपान बापू शिंदे यांनी ‘सहकार सोपान’द्वारे क्युआर कोड निर्माण केले असून, ते पीडीएफ स्वरूपात जिल्हा कार्यालयात तसेच या कार्यालयाच्या अखत्यारीतील सर्व तालुक्यांमधील कार्यालयात उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे ही माहिती घेण्यासाठी नागरिकांना उपनिबधंकांच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही.

जिल्हा उपनिबंधक (सहकार) डाॅ. सोपान शिंदे यांनी नागरिकांना सहकारसंदर्भातील कायदे, आदेश यांची माहिती होण्यासाठी अनुक्रमे सहकार सोपान क्युआर कोड ग्रंथालय आणि सहकार सोपान निर्णय संचयनी यांची निर्मिती राज्यभरातील सहकार विभागात वेगळा उपक्रम राबविला आहे. तसेच नागरिकांना विविध सहकारी संस्था स्थापन करताना नोंदणीचे निकष, कागदपत्रांची यादी आणि आदर्श उपविधी यांची माहिती घेण्यासाठी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी यायला लागू नये, या उद्देशाने डाॅ. शिंदे यांनी विविध पाच सहकारी संस्थांसाठी तसेच अन्य तीन बाबींच्या माहितीसाठी असे आठ स्वतंत्र क्युआर कोड तयार केले आहेत.

आवश्यक असलेल्या सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी संबंधित क्युआर कोड मोबाइलवर स्कॅन करताच काही सेकंदातच सुमारे साडेपाचशे पानांची ही सर्व माहिती पीडीएफद्वारे मोबाइलवर दिसू लागते. त्यामुळे राज्यभरातील कुठलीही व्यक्ती अगदी या क्युआर कोडद्वारे सहकारी संस्थांच्या नोंदणीची माहिती घेऊ शकते. विशेष म्हणजे या सेवेसाठी कुठलेही शुल्क देण्याची गरज नाही.

क्युआर कोडवर माहिती

बिगरशेती, नागरी, पगारदार पतसंस्था, प्राथमिक कृषी पतसंस्था, सर्वसाधारण संस्था, मजूर संस्था, गृहनिर्माण संस्था या पाच संस्थांच्या नोंदणीसाठी तसेच 'महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्स कायदा' (मोफा) अंतर्गत विकासक असहकार्याने नोंदणी, एकतर्फी मानीव हस्तांतरण आणि गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींचा पुनर्विकास अशा आठ बाबींची माहिती या क्युआर कोडवर उपलब्ध आहे.

नागरिक, सहकाराचे अभ्यासक, पक्षकार यांना विनाअर्ज, विनाशुल्क, विनासंपर्क आणि विनाविलंब ही माहिती उपलब्ध होण्यासाठी ‘सहकार सोपान’द्वारे विविध संस्थांची नोंदणी आणि अन्य विषयासंदर्भात क्युआर कोड उपलब्ध करून देण्यात आल्याने त्यांना या माहितीसाठी आमच्या कार्यालयांमध्ये येण्याची गरज नाही. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. सहकार सोपानचा अर्थ सहकाराचा मार्ग किंवा पायरी. या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा. - डाॅ. सोपान शिंदे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), रत्नागिरी

Web Title: Information on registration of cooperative societies list of documents will be available with one click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.