शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

इंडिया आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे टीकास्त्र

By मनोज मुळ्ये | Updated: May 3, 2024 18:31 IST

ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव घ्यायची लाज वाटते, त्यांची शिवसेना खरी कशी असेल?

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर उभी राहिलेली इंडिया आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी रत्नागिरीतील जाहीर सभेत केली. या फॅन क्लबसोबत राहायचे की नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहायचे, हे तुम्हाला निश्चित करायचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले. या सभेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्ला चढवला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार उद्धव ठाकरे नसून, एकनाथ शिंदे, नारायण राणे, राज ठाकरे हे आहेत असेही ते म्हणाले.महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजप नेते अमित शाह यांची जाहीर प्रचारसभा रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर झाली. यावेळी व्यासपीठावर नारायण राणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नितेश राणे, आमदार शेखर निकम, किरण सामंत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर, डॉ. पां. वा. कामणे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांची ही भूमी असल्याने येथे येण्याचा आपल्याला अतिशय आनंद असल्याचे मंत्री अमित शाह यांनी भाषणाच्या सुरुवातीला सांगितले. आपल्या भाषणात त्यांनी प्राधान्याने उद्धव ठाकरे यांना लक्ष्य बनवले. ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव घ्यायची लाज वाटते, त्यांची शिवसेना खरी कशी असेल? उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली आहे आणि एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी आहे, असे ते म्हणाले. जे स्वत:ची सत्ता आणण्यासाठी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या आश्रयाला गेले, ते महाराष्ट्राचा गौरव सांभाळू शकत नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर ३७० कलम हटवले गेले. जगात अकराव्या क्रमांकावर असलेली भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आली. आता तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाले तर हीच अर्थव्यवस्था अमेरिका, रशियापाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर येईल. देशातून मुस्लिम पर्सनल लॉ संपवण्यात येईल, असा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी गेल्या काही वर्षात मोदी सरकारने राबवलेल्या योजनांची व त्याच्या लाभार्थ्यांची माहिती दिली. कोरोना काळात मोदी सरकारने लोकांना लस दिली आणि त्यावेळी उद्धव ठाकरे महाराष्ट्रात खिचडी खात होते, अशी टीकाही त्यांनी केली.यावेळी राष्ट्रवादीचे अजित यशवंतराव, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, कोकरे महाराज, माजी आमदार बाळ माने, चित्रा वाघ, चंद्रशेखर बावनकुळे, उदय सामंत अणि नारायण राणे यांची भाषणे झाली.

दगड उचलायचीही हिंमत नाहीकलम ३७० हटवले गेले तर काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील, असे राहुल गांधी यांचे मत होते. मात्र पाच वर्षात काश्मीरमध्ये दगड उचलण्याची हिंमतही कोणी केलेली नाही, असे शाह यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Amit Shahअमित शाहNarayan Raneनारायण राणेINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी