शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
7
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
8
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
9
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
10
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
11
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
12
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
13
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
14
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
15
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
16
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
17
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
18
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
19
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
20
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 

स्वतंत्र कोकण विद्यापीठ प्रश्नी शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी बोलावली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2018 4:10 PM

रत्नागिरी : मागील दोन अर्थसंकल्पीय अधिवेशनांमध्ये कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ व्हावे, अशी मागणी करून देखील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयामध्ये गंभीरपणे लक्ष न घातल्याने कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ मिळण्याच्या आशा संपुष्टात येण्याची चिन्ह दिसू लागली होती. परंतु शिवसेनेने हा प्रश्न उचलून धरल्यामुळे आता कोकणाला स्वतंत्र विद्यापीठ मिळण्याच्या आशा पुन्हा ...

रत्नागिरी : मागील दोन अर्थसंकल्पीय अधिवेशनांमध्ये कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ व्हावे, अशी मागणी करून देखील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयामध्ये गंभीरपणे लक्ष न घातल्याने कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ मिळण्याच्या आशा संपुष्टात येण्याची चिन्ह दिसू लागली होती. परंतु शिवसेनेने हा प्रश्न उचलून धरल्यामुळे आता कोकणाला स्वतंत्र विद्यापीठ मिळण्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. याबाबत शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांनी तातडीने बैठक बाेलावली आहे.

काही दिवसांपूर्वीच चिपळूण येथे झालेल्या मेळाव्यामध्ये आमदार राजन साळवी ह्यांनी समितीला आपण कोकणातील सर्व आमदारांना एकत्र घेऊन यासंबंधी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले होते. आपले दिलेले आश्वासन पाळत आमदार राजन साळवी यांनी सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोकणाला स्वतंत्र विद्यापीठ मिळयासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला. तत्पूर्वी कालच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे   खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील शिवसेनेच्या सर्व आमदारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत कोकणाला स्वतंत्र विद्यापीठ मिळण्याची एकमुखी मागणी केली होती.

या मागणीला अनुसरून आमदार राजन साळवी यांनी आज विधिमंडळामध्ये यासंबंधी तारांकित प्रश्न उपस्थित करून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यासमयी  विनोद तावडे यांनी तात्काळ या मागणी संदर्भात एक विशेष समिती स्थापन केली व या समितीच्या अहवालानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले व पुढील आठवड्यामध्ये समिती सदस्य व आमदार यांची बैठक घेऊन यावर निर्णय घेणार असल्याचे सांगितले. कोकणाला स्वतंत्र विद्यापीठ मिळण्याच्या दृष्टीने आमदार राजन साळवी यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आल्याचे हे संकेत मानले जात आहेत.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे