शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

आरोग्यावरील ताण वाढला; कर्मचाऱ्यांची होतेय ओढाताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 6:34 PM

CoronaVirus Ratnagiri -रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णसंख्येचा विस्फोट होऊ लागल्याने आता आरोग्य यंत्रणेची धावपळ सुरू आहे. मात्र, या यंत्रणेत अपुरे डॉक्टर तसेच अन्य कर्मचारी यामुळे सध्या या यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. रूग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेची ओढाताण होऊ लागली आहे.

ठळक मुद्देआरोग्यावरील ताण वाढला; कर्मचाऱ्यांची होतेय ओढाताण जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संख्येच्या तुलनेने आरोग्य यंत्रणा अपुरी

शोभना कांबळेरत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णसंख्येचा विस्फोट होऊ लागल्याने आता आरोग्य यंत्रणेची धावपळ सुरू आहे. मात्र, या यंत्रणेत अपुरे डॉक्टर तसेच अन्य कर्मचारी यामुळे सध्या या यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. रूग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेची ओढाताण होऊ लागली आहे.जिल्ह्यात गतवर्षासारखी कोरोना स्थिती निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे पुन्हा जिल्ह्यासह देशाची स्थिती चिंताजनक होऊ लागली आहे. ऑक्टोबर महिन्यात बंद करण्यात आलेली कोविड रूग्णालये तसेच कोरोना केअर सेंटर, कोविड आरोग्य केंद्रे यांच्यात पुन्हा वाढ करण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला आहे. मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच रूग्णसंख्या एकाच दिवशी अगदी दीडशेपर्यंत जाऊ लागली आहे. त्यामुळे गेले वर्षभरच आरोग्य सेवेत व्यग्र असलेल्या आरोग्य यंत्रणेची आताही कसरत सुरूच आहे. अपुऱ्या मनुष्यबळावर सध्या ही यंत्रणा दिवस-रात्र काम करीत आहे.डिसेंबर महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी दुसऱ्या लाटेचा धोका व्यक्त होऊ लागल्याने शासनाने १६ जानेवारीपासून देशभरातच लसीकरण मोहीम सुरू केली. यात आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, परिचारिका, अन्य आरोग्य कर्मचारी यांच्यानंतर कोरोनाशी लढा देणारे पहिल्या फळीतील महसूल कर्मचारी, पोलीस त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेले ४५ वर्षांवरील नागरिक आणि आता ४५ वर्षांवरील सर्व नागरिक यांना लसीकरण केले जात आहे.सध्या जिल्ह्यात जिल्हा शासकीय रूग्णालये, दापोली, कळंबणी, कामथे ही तीन उपजिल्हा रूग्णालये, सर्व ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आदी ९४ केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, परिचारिका तसेच अन्य आरोग्य कर्मचारी व्यग्र असतानाच आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळावर आता ही यंत्रणा पुन्हा कोरोनाशी अथक लढा देण्यासाठी सज्ज आहे. 

गेल्यावर्षाप्रमाणे यावर्षीही जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेत कमी मनुष्यबळ असले तरीही जिल्हा शासकीय रूग्णालयातील नॉनकोविड रूग्णालयाचे डॉक्टर्स हे कोविड रूग्णालयात सेवा देत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आता कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यास शासनाकडून परवानगी मिळाली आहे. त्यामुळे जशी पदांची गरज भासेल, त्याप्रमाणे डॉक्टर्स, परिचारिका यांची पदे तातडीने भरण्यात येणार आहेत.- डॉ. संघमित्रा फुले - गावडे,जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी

 

निकषापेक्षा कमी

  • शासनाच्या निकषाप्रमाणे १०० खाटांमागे ४६ परिचारिका आवश्यक आहेत. मात्र, जिल्हा रूग्णालयाच्या कोविड रूग्णालयात ११० खाटांसाठी केवळ ३४ परिचारिका आहेत.

पद      सध्या कर्मचारी

  • वैद्यकशास्त्र तज्ज्ञ (एमडी) ००
  • मेडिकल मायक्रोबायोलॉस्ट ००
  • इंटेन्सिस्ट ००
  • एमबीबीएस ००००
  • स्टाफ नर्स ३४
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ ०२
  • एएनएम ४००

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdocterडॉक्टरRatnagiriरत्नागिरी