पुरातन विकास योजनेत धूतपापेश्वर मंदिराचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 16:27 IST2021-03-09T16:25:04+5:302021-03-09T16:27:33+5:30

Bidget Temple Religious Places Ratnagiri - राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी राजापुरातील श्री धूतपापेश्वर मंदिराचा समावेश पुरातन विकास योजनेत केला आहे. या निर्णयामुळे राजापूरवासियांनी आनंदोत्सव साजरा केला.

Inclusion of Dhootpapeshwar temple in the ancient development plan | पुरातन विकास योजनेत धूतपापेश्वर मंदिराचा समावेश

पुरातन विकास योजनेत धूतपापेश्वर मंदिराचा समावेश

ठळक मुद्देराजापुरात आनंदोत्सव साजरा अर्थसंकल्पात समावेश, प्राचीन मंदिराचा होणार विकास

राजापूर : राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी राजापुरातील श्री धूतपापेश्वर मंदिराचा समावेश पुरातन विकास योजनेत केला आहे. या निर्णयामुळे राजापूरवासियांनी आनंदोत्सव साजरा केला.

राजापूर शहरानजीक असलेल्या धोपेश्वर येथील धूतपापेश्वर हे जागृत व पुरातन मंदिर आहे. या मंदिराला भाविक मोठ्या संख्येने भेट देतात. श्रावण महिन्यासह महाशिवरात्रीला या मंदिरात भक्तीचा मळा फुलतो. या मंदिर परिसराचे जतन व संवर्धन करण्यासाठी शासनाच्या पुरातन विकास योजनेतून निधीची तरतूद करण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी अर्थसंकल्पात केली आहे.

पहिल्या टप्प्यात राज्यातील आठ स्थळांचा समावेश असून, त्यामध्ये धूतपापेश्वर मंदिराचा समावेश आहे. यासाठी आमदार राजन साळवी, खासदार विनायक राऊत यांनी विशेष प्रयत्न करताना शासनाकडे पाठपुरावा केला होता. अर्थसंकल्पात धूतपापेश्वर मंदिराची पुरातन विकास योजनेत निवड करण्यात आल्याची घोषणा होताच राजापुरात जोरदार स्वागत करण्यात आले.

Web Title: Inclusion of Dhootpapeshwar temple in the ancient development plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.