कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक; आमदार भास्कर जाधवांच्या पुढाकाराने सकारात्मक वाटचाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 23:41 IST2025-07-09T23:30:39+5:302025-07-09T23:41:37+5:30
संदीप बांद्रे चिपळूण : कोकणातील रेल्वे प्रवाशांना दररोज होणाऱ्या त्रासाबाबत आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी मंत्रालयात पार ...

कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक; आमदार भास्कर जाधवांच्या पुढाकाराने सकारात्मक वाटचाल
संदीप बांद्रे
चिपळूण : कोकणातील रेल्वे प्रवाशांना दररोज होणाऱ्या त्रासाबाबत आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी मंत्रालयात पार पडली. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीचे आयोजन आमदार भास्कर जाधव यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते.
कोकण रेल्वे मार्गावरील विविध समस्यांकडे लक्ष वेधत आमदार जाधव यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर ठोस मागण्या मांडल्या. यामध्ये दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी पुन्हा सुरू करणे, पनवेल ते चिपळूण दरम्यान नवीन गाडी सुरू करणे, तसेच रत्नागिरी व चिपळूण येथे रेल्वे आरक्षण कोटा वाढवणे अशा महत्त्वपूर्ण मागण्यांचा समावेश होता. या बैठकीला उपस्थित असलेल्या रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. या प्रस्तावांना रेल्वे बोर्डाकडून मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करू, असा शब्द दिला.
या बैठकीमुळे कोकणातील हजारो रेल्वे प्रवाशांच्या अडचणी लवकरच सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. आमदार भास्कर जाधव यांच्या सक्रिय सहभागामुळे ही बैठक फलदायी ठरली आहे.