शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

... तर 18 जणांचा जीव वाचला असता, फेब्रुवारी महिन्यातच दिली होती तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 13:52 IST

तिवरे (भेदवाडी) येथील रहिवासी असलेल्या अजित चव्हाण यांनी ही तक्रार दिली होती.

रत्नागिरी - तिवरे धरण रात्री नऊच्या सुमारास फुटलं. त्यामध्ये 24 जण वाहून गेले. आतापर्यंत 18 जणांचे मृतदेह हाती लागले असून एकजण जिवंत आढळले आहेत. तर इतरांचा शोध सुरू आहे. धरण फुटल्यामुळे 13 घरं वाहून गेल्यानं वित्तहानीदेखील झाली आहे. धरण दुरुस्तीचा प्रस्ताव लालफितीत अडकला नसता, तर हा अनुचित प्रकार टाळता आला असता. तसेच, धरणाला पडलेल्या भगदाडीच्या तक्रारीची दखल घेतली असती, तर 18 जणांचा जीव वाचला असता. 

तिवरे धरण फुटीच्या अगोदरच या धरणाला भगदाड पडल्याची तक्रार चिपळूणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आली होती. तिवरे (भेदवाडी) येथील रहिवासी असलेल्या अजित चव्हाण यांनी ही तक्रार दिली होती. विशेष म्हणजे 11 फेब्रुवारी रोजीच ही तक्रार देण्यात आली होती. त्यावेळी, नुकतीच उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने पाण्याचा साठी आणि विसर्ग नसल्याचाही उल्लेख या तक्रारीत करण्यात आला होता. तसेच, आगामी काळातील पावसाळा लक्षात घेता, लवकरात लवकर या धरणाला पडलेल्या भगदाडासंदर्भात आवश्यक त्या सूचना करण्याचेही चव्हाण यांनी तक्रारीत म्हटले होते. मात्र, नेहमीप्रमाणेच सरकारी कार्यालयाचा ढिसाळपणा अन् अधिकाऱ्यांची अनास्था या दुर्दैवी घटनेला कारणीभूत ठरली आहे. 

दरम्यान, तिवरे धरणाला दुरूस्तीची गरज असल्याचं आधीच लक्षात आलं होतं. खासदार विनायक राऊत यांनी त्याची दखल घेत या कामाकडे लक्ष देण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली होती. त्यावेळी माती टाकून दुरूस्ती करण्याचा प्रयत्न झाला. धरण दुरूस्तीसाठी निधीचा प्रस्ताव आधीच पाठवण्यात आला होता. तो निधी वेळेत मिळाला असता तर, सर्व ग्रामस्थांचे प्राण वाचले असते

काळ आला होता पण...काळ आला होता पण वेळ आली नव्हती, देवाचा धावा केल्यानेच वाचलो, अशी प्रतिक्रिया या संकटातून बचावलेल्या अरूण पुजारी यांनी बोलून दाखविली. पुजारी हे मूळचे मालवण तोंडवली येथील असून त्यांनी तिवरे गावामध्ये भेंदवाडी येथे मजबूत दोन मजली घर बांधले आहे. स्लॅबच्या असलेल्या या घराच्या मध्यभागी या पाण्याचा मारा होत होता. मात्र आपण वरच्या मजल्यावर असल्याने सुखरुप राहिलो. नजरेसमोरुन पाण्याचा मोठा प्रवाह तासभर वाहत होता. हे भीतीदायक चित्र पाहताना आपणदेखील मनाची तयारी केली होती. मात्र सुदैवाने घराचा मागील कोपरा पाण्याच्या माऱ्यामुळे तुटून गेला. स्लॅबच्या घरामुळे आपण वाचल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :DamधरणRatnagiriरत्नागिरीRainपाऊस