शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: प्रियकराच्या साथीने पतीचा खून, पोलिसांनी चोवीस तासांत दोन्ही संशयितांना केले गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 12:26 IST

गुहागर : तालुक्यातील देवघर येथील नदीकिनारी कुजलेल्या अवस्थेत गणेश माने याचा मृतदेह सापडला. त्याची पत्नी व तिच्या प्रियकराने मिळून ...

गुहागर : तालुक्यातील देवघर येथील नदीकिनारी कुजलेल्या अवस्थेत गणेश माने याचा मृतदेह सापडला. त्याची पत्नी व तिच्या प्रियकराने मिळून हा खून केला असल्याचे पोलिस तपासात पुढे आले असून, गुहागरपोलिसांनी जयश्री माने (वय ३७) व प्रदीप सीताराम कदम (४२, रा. खेड) या दोघांनाही बुधवारी पहाटे अटक केली आहे. या दोघांनी गणेश माने याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील आंबडस गवळवाडी येथील गणेश शिवराम माने याची सासूरवाडी चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे गोपाळवाडी येथील आहे. १ जून रोजी गणेश माने याचा मृतदेह देवघर येथील नदीकिनारी आढळला होता. तो कुजलेल्या अवस्थेत असल्याने शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.शवविच्छेदन अहवालानुसार, डोक्याच्या पाठीमागील व पुढील भागावर कवटीला मार बसल्याने गणेशचा मृत्यू झाला आहे. यामुळे हा घातपातच असल्याचे गुहागर पोलिसांनी हेरले. गेले तीन दिवस या प्रकरणी गुहागर पोलिसांनी तपासाची सूत्रे अधिक वेगाने फिरवली आणि अखेर बुधवारी गणेशची पत्नी व तिचा प्रियकर या दोघांना गुहागर पोलिसांनी अटक केली.गणेश मानेच्या पत्नीचा लॉकडाऊन काळात खेड तालुक्यातील आंबडस गवळवाडी येथील वडापचालक प्रदीप कदम याच्याशी संपर्क आला. त्याचा आपल्या पत्नीशी घटस्फोट झाला आहे. त्याचे व जयश्री मानेचे सूत जुळले. गेली चार वर्षे सुरू असलेल्या या प्रेमप्रकरणाचा सात ते आठ महिन्यांपूर्वी गणेश माने याला सुगावा लागला. यामुळे गणेशचे पत्नीशी खटके उडू लागले. गणेश तिला मारहाणही करत असे. त्यामुळे चार महिन्यांपूर्वी ती आपल्या माहेरी जाऊन राहू लागली. मात्र गणेश माने हा त्रास देत असल्याने अखेर त्याचा कायमचा काटा काढण्याचे तिने व तिच्या प्रियकराने ठरवले. यासाठी १७ एप्रिल रोजी तिने गणेशला मार्गताम्हाणे येथे बोलावून घेतले. सायंकाळी ६ च्या सुमारास देवघर येथील नदीकिनारी बोलण्यासाठी घेऊन गेली. तेथे तिने व प्रदीप कदम याने दगडाने डोक्यावर मारहाण करत गणेशचा खून केला आणि मृतदेह नदीच्या पात्रात टाकून दिला, असा घटनाक्रम या खुनामध्ये समोर येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीguhagar-acगुहागरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस