कोकरे गणातील शेकडो राष्ट्रवादी कार्यकर्ते शिवसेनेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:38 IST2021-09-09T04:38:53+5:302021-09-09T04:38:53+5:30
चिपळूण : कोकरे जिल्हा परिषद गटातील कोकरे गणामध्ये समाविष्ट असलेल्या येगाव, नांदगाव, कुटरे आदी गावांतील शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ...

कोकरे गणातील शेकडो राष्ट्रवादी कार्यकर्ते शिवसेनेत
चिपळूण : कोकरे जिल्हा परिषद गटातील कोकरे गणामध्ये समाविष्ट असलेल्या येगाव, नांदगाव, कुटरे आदी गावांतील शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या भागातील माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष चव्हाण आणि जिल्हा परिषद सदस्य पूनम चव्हाण यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश झाला. शिवसेनेच्या माध्यमातून होत असलेली विकासकामे आणि आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन या गणातील कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे शिवसेनेत सामील झाले. प्रवेशकर्त्यांमध्ये माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र मोलक, कुटरेच्या माजी सरपंच सुवर्णा मोलक, मारुती सवरटकर, नांदगावचे चंद्रकांत घाग, माजी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष अनिल मोरे, येगावचे माजी तंटामुक्त गावसमिती अध्यक्ष वसंत चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य अजय चव्हाण, प्रकाश कदम, जयश्री भागडे, रेश्मा चव्हाण, नांदगावचे महेश भुवड, केशव घडशी, सदानंद घडशी आदींचा समावेश आहे.
यावेळी नायशीचे सरपंच किशोर घाग, उपविभाग प्रमुख अनिल रसाळ, माजी पंचायत समिती सदस्य जयश्री खेराडे, रमेश घाग, विक्रांत चव्हाण, अंकुश बुदर आदी उपस्थित होते.