शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वादळाच्या इशाऱ्यामुळे बागायतदार चिंतेत, कोकणात पावसाची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 12:31 IST

रत्नागिरी : बंगालच्या उपसागरात वादळाचा प्रभाव सुरू झाला असून, येत्या आठवड्यात गुरुवारपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत दक्षिण ...

रत्नागिरी : बंगालच्या उपसागरात वादळाचा प्रभाव सुरू झाला असून, येत्या आठवड्यात गुरुवारपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अपेक्षित गारठा नसून ढगाळ हवामान आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत.बंगालच्या उपसागरात मंदूस चक्रीवादळाची निर्मिती झाली. पूर्व किनाऱ्याकडे झेपावत असलेले वादळ पूर्व किनाऱ्यावरील पदुच्चेरी, श्रीहरिकोटा ते महाबलीपूरम दरम्यान किनाऱ्याला धडकले आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाच्या शक्यतेने गारठा गायब झाला असून, तापमानातही किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. थंडी पुन्हा गायब झाल्याने पहिल्याच टप्प्यात आंबा बागायतदारांच्या समस्येत वाढ झाली आहे.पावसाच्या शक्यतेने बागायतदारांपुढे कीडरोग संरक्षक फवारण्या व त्यावरील खर्च वाढणार आहे. सध्या केवळ पालवी असून, किरकोळ आलेला मोहोर व पालवीच संरक्षण करण्यासाठी बागायतदारांना हवामानाचा अंदाज घेत फवारण्या कराव्या लागत आहेत. पालवीचे मोहोरात व मोहोराचे फळात रूपांतर होत असताना प्रतिकूल हवामानाचा सामना बागायतदारांना करावा लागत आहे. वेळोवेळी फवारण्या कराव्या लागत असल्याने आंबा उत्पादन खर्चिक बनले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकणRainपाऊसMangoआंबाFarmerशेतकरी