शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासकालीन राजापूर, कडक उन्हाळ्यातही १४ कुंडांमध्ये पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 13:32 IST

कडक उन्हाच्या झळा आता अधिक प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. उन्हाळ्यामुळे भूगर्भातील पाणीपातळीने तळ गाठला असून, सर्वत्र पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण झाले असतानाच राजापूर तालुक्यातील गंगाक्षेत्री असणाऱ्या १४ कुंडांमध्ये मात्र आजही पुरेसे पाणी उपलब्ध आहे.

ठळक मुद्देइतिहासकालीन राजापूर, कडक उन्हाळ्यातही १४ कुंडांमध्ये पाणीसाठापाण्याचे दुर्भीक्ष्य असतानाही गंगाक्षेत्री मुबलक पाणी, स्नानासाठी भाविकांची गर्दी

राजापूर : कडक उन्हाच्या झळा आता अधिक प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. उन्हाळ्यामुळे भूगर्भातील पाणीपातळीने तळ गाठला असून, सर्वत्र पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण झाले असतानाच राजापूर तालुक्यातील गंगाक्षेत्री असणाऱ्या १४ कुंडांमध्ये मात्र आजही पुरेसे पाणी उपलब्ध आहे.इतिहासकालीन राजापूर शहराची ओळख सांगणारे महत्वाचे स्थान म्हणजे गंगाकुंड. मागील अनेक वर्षे दर तीन वर्षांनी याठिकाणी गंगा अवतीर्ण होते. त्यानंतर काही महिन्यांच्या वास्तव्यानंतर ती अंतर्धान पावते, असा तिचा प्रघात राहिला आहे.

मात्र, अलिकडच्या काही वर्षात गंगेचे आगमन व निर्गमन या प्रथेमध्ये बदल झाला असून, आता तर तिचे तीन वर्षांपूर्वीच आगमन व दीर्घकालानंतर निर्गमन असा क्रम सुरु आहे. यापूर्वी तर सलग दोन वर्षे गंगेचे आगमन झाले आहे.साधारणपणे नोव्हेंबर ते मे असा गंगेचा आगमन कालावधी राहिला आहे. जूनमध्येदेखील तिचे आगमन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याचे दुर्भीक्ष्य असताना त्यावेळी डोंगरांनी वेढलेल्या भागात एकाचवेळी १४ कुंडात पाणी उपलब्ध होते व त्यानंतर त्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा होऊनदेखील पाण्याचे प्रमाण जसेच्या तसे राहात असल्याचे पाहायला मिळते.गंगाक्षेत्री काशीकुंडातील पाणी देण्यासाठी गंगापुत्र उपस्थित असतात. मात्र, तशी व्यवस्था अन्य कुंडात नसल्याने अनेकवेळा स्नानासाठी आलेले भाविक कुंडात उतरुन स्वत:च स्नान करतात. शिवाय इतरांनाही पाणी काढून देतात. पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होऊनही या कुंडातील पाण्याच्या पातळीत घट झालेली नाही.बारमाही उष्ण झराराजापूर शहरापासून सुमारे सात ते आठ किलोमीटर अंतरावर हे गंगाक्षेत्र आहे. त्यालगतच बारमाही वाहणारे उष्ण पाण्याचे झरे म्हणजेच उन्हाळे हा भाग येतो. गंगाक्षेत्रावर येणारे भाविक प्रथम उन्हाळे येथे जावून गरम पाण्यात स्नानाचा लाभ घेतात. या पाण्यातही गंधकाचे प्रमाण अधिक प्रमाणात आहे. याठिकाणी आंघोळ करून भाविक गंगाक्षेत्रावर येतात.

टॅग्स :Rajapurchi Gangaराजापूरची गंगाRatnagiriरत्नागिरी