शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

महामार्ग चौपदरीकरणाची गाडी हळूहळू रुळांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 12:21 PM

highway pwd Ratnagiri- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पनवेल ते गोवा या ४५० किलोमीटरच्या मार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. यापैकी इंदापूर ते झाराप हा ३६६ किलोमीटरच्या चौपदरीकरणाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे. या दरम्यान मध्यंतरी रखडलेले काम आता हळूहळू मार्गी लागले असून, आता चौपदरीकरणाच्या कामाला वेग येऊ लागला आहे.

ठळक मुद्देमहामार्ग चौपदरीकरणाची गाडी हळूहळू रुळांवरपाऊस सुरू होण्यापूर्वी अधिकाधिक काम उरकण्याची गरज

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पनवेल ते गोवा या ४५० किलोमीटरच्या मार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. यापैकी इंदापूर ते झाराप हा ३६६ किलोमीटरच्या चौपदरीकरणाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे. या दरम्यान मध्यंतरी रखडलेले काम आता हळूहळू मार्गी लागले असून, आता चौपदरीकरणाच्या कामाला वेग येऊ लागला आहे.महाराष्ट्रातील पनवेल ते झाराप या एकूण ४५० किलोमीटरचे चौपदरीकरण २०१७ सालापासून सुरू करण्यात आले आहे. त्यापैकी इंदापूर ते झाराप या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील ३६६.१७० किलोमीटर मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चार टप्प्यांत सुरू असून, यासाठी ११७४५.९३ कोटी इतका अंदाजपत्रकीय खर्च मंजूर करण्यात आला आहे. या चार टप्प्यांत इंदापूर ते कशेडी ७७ किलोमीटर, कशेडी पायथा ते संगमेश्वर १०४, संगमेश्वर ते लांजा ८६ किलोमीटर आणि राजापूर ते झाराप ९९.१७ किलोमीटर असे एकूण ३६६.१७ किलोमीटरचे चौपदरीकरण सुरू आहे.कशेडी ते परशुराम घाटापर्यंतचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, परशुराम घाट ते आरवली या ३५.९ किलोमीटरच्या चौपदरीकरणाचे काम केवळ २७ टक्के; आरवली ते कांटे या ४० किलोमीटरचे काम केवळ ८ टक्के आणि कॉंटे ते वाकेड या ५०.९० किलोमीटरचे काम केवळ १२ टक्के झाले आहे. मात्र, वाटूळ ते तळगाव आणि त्यापुढे झारापपर्यंतचे काम सुमारे ९५ ते ९९ टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील परशुराम घाट ते वाकेड या जिल्ह्यातील चौपदरीकरण करणाऱ्या आधीच्या कंपनीकडून हे काम काढण्यात आले असून, ते नव्या ठेकेदाराकडे देण्यात आले आहे. त्यामुळे आता चौपदरीकरणाची गती वाढण्याची शक्यता आहे.रायगड तसेच सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमधील महामार्गाच्या चौपदरीकरणाने गती घेतली आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील चौपदरीकरणाचे काम संथगतीने झाले आहे. त्यामुळे आता ठेकेदार बदलल्यामुळे तरी हे काम पावसाळ्यापूर्वी द्रुतगतीने व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा पावसाळ्यात रस्ता चिखलमय होण्याची भीती आहे.सर्वाधिक रत्नागिरीतइंदापूर ते झाराप या ३६६.१७ किलोमीटरच्या चौपदरीकरणात सर्वाधिक २१३ किलोमीटरची लांबी रत्नागिरी जिल्ह्यात आहे. रायगड ७० किलोमीटर, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लांबी ८२.८७ किलोमीटरची आहे.कशेडी बोगदाकशेडी घाटातील बोगद्याचे काम डिसेंबर २०२१पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. रत्नागिरीतील २०५ किलोमीटर लांबीपैकी ७४.९९४ किलोमीटर (डिझाईन लांबी) लांबीचे काम जानेवारी २०२१ अखेर पूर्ण झाले आहे. ५० किलोमीटरचे काम जून २०२१, तर ८८ किलोमीटरचे जून २०२२पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.निम्म्या क्षेत्राचे संपादनइंदापूर ते झाराप या ३६६.१७ किलोमीटरच्या चौपदरीकरणासाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील भूसंपादनाचे क्षेत्रफळ २०१८.३८ हेक्टर असून, त्यापैकी ९७९.२९ हेक्टर क्षेत्र ताब्यात घेण्यात आले आहे. अजून १०४० हेक्टर क्षेत्राचे संपादन करावयाचे बाकी आहे.निम्म्या पुलांचे काम पूर्णइंदापूर ते झाराप या ३६६.१७ किलोमीटरच्या चौपदरीकरणादरम्यान २४ मोठे पूल असून, यापैकी १२ पूर्ण झाले आहेत. ८५ लहान पुलांपैकी ५२, १५८७ मोऱ्यांपैकी ९११, ७७ अंडरपासपैकी ३६ पूर्ण झाले असून, उर्वरित प्रगतीपथावर आहेत. १.८० किलोमीटरच्या बोगद्यापैकी ०.९ किलोमीटरचा बोगदा पूर्ण झाला असून, उर्वरित काम सुरू आहे.

टॅग्स :highwayमहामार्गRatnagiriरत्नागिरीpwdसार्वजनिक बांधकाम विभाग