शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
4
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
5
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
6
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
7
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
8
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
9
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
10
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
11
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
12
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
13
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
14
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
15
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
16
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
17
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
18
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
19
कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
20
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

रो-रो सेवेतून सर्वाधिक उत्पन्न

By admin | Updated: May 11, 2015 23:28 IST

कोकण रेल्वे : ६५ कोटी रूपयांचा महसूल प्राप्त

खेड : कोकण रेल्वेच्या रो - रो सेवेला सध्या चांगले दिवस आले आहेत. मालवाहू ट्रक इच्छितस्थळी पोहोचवणाऱ्या रो - रो सेवेच्या माध्यमातून गेल्या आर्थिक वर्षात कोकण रेल्वेला ६५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. रेल्वे प्रशासनाने ही माहिती दिली. कोकण रेल्वेला एवढ्या मोठ्या प्रमाणात महसूल मिळाल्याने कोकण रेल्वे ही सेवा आता अधिक गतिमान करण्याच्या प्रयत्नात आहे.रेल्वे प्रशासनाला सर्वाधिक उत्पन्न रो - रो आणि मालगाडी सेवेच्या माध्यमातून मिळत असल्याने या सेवेला आता कोकण रेल्वे सर्वाधिक प्राधान्य देणार आहे. कोकण रेल्वेने उत्पन्न वाढीच्या दृष्टीने सुरू केलेली ही सेवा रेल्वेच्या चांगलीच फायद्यात पडली आहे. दरवर्षी कोकण रेल्वेने या सेवेत अमुलाग्र बदल केले आहेत. रो -रोच्या फेऱ्यांमध्ये आता वाढही झाली आहे. आजच्या घडीला कोकण रेल्वे मार्गावरून दिवसागणिक ४ अप डाऊन फेऱ्या होत आहेत. यामुळे सन २०१२ - १३मध्ये ४८ हजार, तर २०१३ - १४मध्ये ५५ हजार मालवाहक ट्रक्सची ने - आण करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या सेवेला अपघात झाले नव्हते़ मात्र, गतवर्र्षी करंजाडी रेल्वे स्थानकानजीक मालगाडीला झालेल्या अपघातानंतर गणेशोत्सवादरम्यान या सेवेला बे्रक लागला होता. परिणामी कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आणि रेल्वे प्रशासनाला मोठा आर्थिक फटका बसला़ त्यानंतरच्या काही महिन्यांकरिता कोकण रेल्वेने मालगाडी सेवा खंडित केली होती. यामुळे आणखी आर्थिक नुकसान झाले. नोव्हेंबरपासून ही सेवा पूर्ण दमाने सुरू करण्यात आली़ याचा मोठा लाभ कोकण रेल्वेला झाला़ तब्बल ६५ करोड रूपयांचा महसूल गतवर्षी कोकण रेल्वेला प्राप्त झाल्याने रो - रो सेवेमध्ये अमुलाग्र बदल घडवित चांगल्या सुविधा देण्याचा कोकण रेल्वेचा सध्या मानस आहे. या सर्व उत्पन्नाचा प्रवाशांना अधिक सुविधा देण्यासाठी वापर होणार आहे. (प्रतिनिधी)रो- रो सेवेला सध्या चांगले दिवस. कोकण रेल्वेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळण्याची पहिली वेळ.कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते.सेवेत आमुलाग्र बदल करण्याचा प्रयत्न करणार.