शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात येत्या ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 17:47 IST

गेल्या दोन दिवसांपासून जलद गतीने प्रवास करत असलेला मान्सून अखेर मुंबई, ठाणे आणि कोकणातील बऱ्याच भागांमध्ये येऊन धडकला आहे.

रत्नागिरी : मान्सून कोकणच्या उंबरठ्यावर पोहोचला असून, येत्या ४८ तासांमध्ये कोकणात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने मान्सून अलर्ट जारी केला आहे. उर्वरित विभागात येणाऱ्या पाच दिवसात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि परिसरातही मध्यम प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.येत्या ४८ तासांत कोकणात मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पोषक वातावरणाने गेल्या दोन दिवसांपासून जलद गतीने प्रवास करत असलेला मान्सून अखेर मुंबई, ठाणे आणि कोकणातील बऱ्याच भागांमध्ये येऊन धडकला आहे.दुसरीकडे, कोकणसह गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पाँडिचेरी भागात येत्या चार ते पाच दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या ४८ तासांत मान्सून उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा काही भाग, दक्षिण मध्य प्रदेशचा काही भाग, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक आणि तामिळनाडू तसंच विदर्भ आणि तेलंगणाच्या काही भागात पोहोचेल.अरबी समुद्राच्या बाजूने मोसमी पावसाच्या प्रवासाला ९ जूनपासून चांगली चालना मिळाली आहे. पोषक वातावरण तयार झाल्याने १० जूनला पावसाने गोवा पार करून दक्षिण कोकणातून पूर्वमोसमी पावसाने हलकी चाहूल दिली. सध्या मोसमी पावसाच्या प्रवासाला अनुकूल वातावरण असल्याने पुढील ४८ तासांमध्ये मान्सूनचा प्रवास देशव्यापी होत जाईल.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसweatherहवामान