शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत पावसाचा जोर; ‘जगबुडी’, ‘कोदवली’ इशारा पातळीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 15:50 IST

सर्वाधिक पाऊस राजापूर, लांजा तालुक्यात

रत्नागिरी : पावसाचा जोर बुधवारी रात्रीपासून वाढला असला तरी अजूनही त्यात सातत्य नाही. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाच्या सरी पडत असल्या तरी गुरुवारी दुपारी खेडमधील ‘जगबुडी’ आणि राजापुरातील ‘काेदवली’ नद्यांची पातळी इशारा पातळीवर पाेहाेचली हाेती.बुधवारी सायंकाळपासून पावसाचा जाेर वाढला आहे. जोरदार वाऱ्यासह रात्रभर पाऊस पडत होता. गुरुवारी सकाळी काही विश्रांती घेतलेल्या पावसाच्या अधूनमधून सरी काेसळत हाेत्या. सरींचा जोर वाढल्याने वातावरणात काहीसा गारवा आला हाेता.जुलै महिना सुरू झाला तरीही म्हणावा तसा पाऊस अजूनही सुरू झालेला नाही. आतापर्यंत २७ टक्के पाऊस पडला आहे. बुधवारी रात्री जोरदार पडलेल्या पावसामुळे गुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण ७०.२० मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद येथील जिल्हा नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली आहे. सर्वाधिक पाऊस राजापूर आणि लांजा तालुक्यात १०० मिलिमीटरपेक्षा अधिक नोंदविण्यात आला आहे.दरम्यान, गुरुवारी दुपारी जगबुडी नदीची पातळी ५.४० मिलिमीटर, तर काेदवली नदीची पाणीपातळी ५.७० मीटरपर्यंत पाेहाेचली हाेती. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.