शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत रात्री मुसळधार; दिवसा उन्हाचा कडाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 15:56 IST

सध्या शेतकऱ्यांसह नागरिक मान्सून नियमित होण्याची प्रतीक्षा करत आहेत

रत्नागिरी : पावसाने गेल्या काही दिवसांपासून रात्री मुसळधारेने पडण्यास सुरूवात केली आहे. मात्र, दिवसा कडाक्याच्या उन्हाचा सामना करावा लागत आहे. रविवारी रात्री विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली हाेती. साेमवारी सकाळीही पावसाचा जाेर कायम हाेता. मात्र, त्यानंतर कडक ऊन पडले हाेते.पावसाने मे महिन्यात जोरदार वृष्टी केली असली, तरी मे महिन्याच्या शेवटच्या तीन-चार दिवसांपासून विश्रांती घेण्यास सुरूवात केली आहे. हवामान खात्याकडून अधूनमधून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात पावसाचा जोर कमी झाला आहे.रविवारी दिवसभर पावसाचे वातावरण होते. त्यामुळे किरकोळ सरी पडतील, असे वाटत होते. मात्र, पावसाने हुलकावणीच दिली होती. रात्री १० वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह विजांच्या लखलखाटात पावसाला सुरूवात झाली. पावसाचा जाेर पाहता मान्सूनचे आगमन झाल्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली गेली. मात्र, हा पाऊस जिल्ह्यातील काही भागातच पडला तर काही भाग काेरडेच राहिले.सोमवारी सकाळी आभाळ ढगाळलेले असल्याने जोरदार पावसाची शक्यता वाटत होती. मात्र, सकाळी एकच सर कोसळल्यानंतर पावसाने पुन्हा दिवसभर विश्रांती घेतली हाेती. त्यामुळे उकाडा वाढला. अधूनमधून ढगाळ वातावरण होते. मात्र, पावसाची दिवसभर पाठच होती. परंतु, वातावरणातील बदल पाहता रात्री जोरदार वृष्टी होण्याची शक्यता वाटत होती.दरम्यान, हवामान खात्याने १० ते १२ जूनपासून मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तविली आहे. मात्र, सध्या दिवसभर वातावरण कोरडे राहात असून, रात्री पावसाचा जोर वाढलेला असतो. परंतु, दिवसा उन्हामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांसह नागरिक मान्सून नियमित होण्याची प्रतीक्षा करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसTemperatureतापमानFarmerशेतकरी