लग्न होत नसल्याने गळफास लावून जीवन संपविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 13:55 IST2020-09-25T13:54:28+5:302020-09-25T13:55:40+5:30
लग्न होत नसल्याने दारुच्या आहारी जाऊन मानसिक तणावाखाली २८ वर्षीय तरूणाने घरात गळफास लावून आत्महत्या केली़ ही घटना संगमेश्वर तालुक्यातील मौजे कोंडगाव जोयशीवाडी येथे घडली़ आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव अनिल अनंत रांबाडे (२८, कोंडगाव जोयशीवाडी, ता़ संगमेश्वर) असे आहे़.

लग्न होत नसल्याने गळफास लावून जीवन संपविले
रत्नागिरी : लग्न होत नसल्याने दारुच्या आहारी जाऊन मानसिक तणावाखाली २८ वर्षीय तरूणाने घरात गळफास लावून आत्महत्या केली़ ही घटना संगमेश्वर तालुक्यातील मौजे कोंडगाव जोयशीवाडी येथे घडली़. आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव अनिल अनंत रांबाडे (२८, कोंडगाव जोयशीवाडी, ता़ संगमेश्वर) असे आहे़.
गेला काही काळ अनिलचे लग्न ठरवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र लग्न होत नसल्याने तो नेहमी मानसिक तणावाखाली होता. अखेर तणावामुळे तो दारुच्या आहारी गेला़ याच मानसिक स्थितीत त्याने राहत्या घरातच सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोणी नसल्याने पाहून त्याने गळफास लावून आत्महत्या केली़.
या घटनेबद्दल गावातील अनेकांनी हळहळ व्यक्त केली़ त्यानंतर त्याचा मोठा भाऊ मिलिंद अनंत रांबाडे याने देवरुख पोलीसांना कळविले़ पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे़ विच्छेदनानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.