रत्नागिरीतील आरोग्य मंदिर येथे हार्डवेअरच्या दुकानाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 11:21 IST2020-01-28T11:20:07+5:302020-01-28T11:21:04+5:30
रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिर येथील विश्वकर्मा ट्रेडर्स या हार्डवेअरच्या दुकानाला सोमवारी रात्री १ वाजण्याच्या सुमाराला अचानक आग लागली. या आगीत दुकानातील संपूर्ण सामान खाक झाले आहे.

रत्नागिरीतील आरोग्य मंदिर येथे हार्डवेअरच्या दुकानाला आग
रत्नागिरी : शहरातील आरोग्य मंदिर येथील विश्वकर्मा ट्रेडर्स या हार्डवेअरच्या दुकानाला सोमवारी रात्री १ वाजण्याच्या सुमाराला अचानक आग लागली. या आगीत दुकानातील संपूर्ण सामान खाक झाले आहे.
दुकानातून मोठ्या प्रमाणावर धूर येऊ लागल्याने लोकांनी नगरपरिषदेकडे अग्निशामक यंत्रणेला कळवले. अग्निशामक दल घटनास्थळी आला, परंतु तोपर्यंत दुकानातील मालाने पूर्णपणे पेट घेतला होता. नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या मदतीसाठी फिनोलेक्स कंपनीचाही अग्निशामक घटनास्थळी आला.
दुकानातील आतील मालाने पेट घेतल्याने शटर उघडून जेसीबीच्या सहायाने माल बाहेर करण्यात आला. परंतू आगीने दुकानातील मालाचे मोठे नुकसान झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज आहे.