शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

अक्षय तृतीयेला हापूसची चव महागच; सध्या दर किती.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 17:01 IST

दरातील घसरण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

रत्नागिरी : वाढत्या उष्णतेने आंबा लवकर तयार होत असल्यामुळे बाजारातील आवक वाढली आहे. आवक वाढल्यामुळे आंब्याच्या दरात घसरण झाली आहे. सध्या हजार ते दोन हजार रुपये इतका पेटीचा दर आहे. दरात झालेली ही घसरण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचीच आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेला आंब्याचा मुहूर्त करणाऱ्यांना त्याची चव महागच पडणार आहे.यावर्षी एकूणच आंबा उत्पादन कमी आहे. त्यातच बाजारातील दर घसरल्यामुळे बागायतदारांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. दरवर्षी एप्रिलच्या ३० तारखेपर्यंत मुंबई बाजारपेठेतील दर अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत टिकून असतात, यावर्षी आधीच दर घसरले आहेत. या उत्पन्नातून खत व्यवस्थापनासह मजुरी, वाहतूक, पॅकिंग यासाठी होणारा खर्चही निघू शकणार नाही.दरवर्षी अनेकजण अक्षय तृतीयेला आंब्याचा मुहूर्त करतात. मात्र, यावर्षी अजूनही आंब्याचे दर न परवडणारे असेच आहेत. त्यामुळे यावर्षी चढ्या दरानेच आंबा खरेदी करुन मुहूर्त करावा लागणार आहे.

पावसामुळे संकटएप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस पडला, त्यानंतर वाढलेल्या उष्म्यामुळे आंबा झाडावरच पिकू लागला आहे. त्यामुळे बागायतदारांचे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी आंबा पिकून गळून पडत आहे.

मुंबईतील दरात घसरणमुंबई येथील वाशी बाजारपेठेत पेटीला हजार ते दोन हजार रुपये दर दिला जात आहे. मात्र, काही बागायतदारांनी व्यापाऱ्यांकडून पैसे ॲडव्हान्स घेतल्यामुळे त्यांना मुंबईत आंबा विक्रीसाठी पाठवावा लागत आहे. पेटीमागे हजार ते बाराशे रुपयांचे नुकसान होत आहे.

स्थानिक बाजारात दरसध्या स्थानिक बाजारात ५०० ते ७०० रुपये डझन दराने आंबा विक्री सुरू आहे. मुंबई बाजारपेठेत दर गडगडलेले असले तरी स्थानिक बाजारात दर चांगला आहे. मात्र, स्थानिक बाजारात मुंबईप्रमाणे ग्राहकसंख्या नसल्याने विक्रीवर मर्यादा येत आहे.

सध्याचे वाशी बाजारपेठेतील दर परवडणारे नाहीत. एका पेटीला येणारा खर्च व मिळणारा दर यामध्ये कमालीचा फरक आहे. त्यामुळे यावर्षी बँकांची कर्ज परतफेड, मजूर, कीटकनाशकांची बिले भागविणे अवघड होणार आहे. पुन्हा एकदा आर्थिक गणित विस्कटणार आहे. -राजन कदम, बागायतदार

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाAkshaya Tritiyaअक्षय्य तृतीयाMarketबाजार