शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

सरकार पेट्रोलचे नावही बदलेल : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 8:06 PM

खेड : सध्या नावं बदलण्याचा जमाना आहे आणि आता सरकार पेट्रोलचेही नाव आता बदलणार असून त्याचे नाव पंडीत दीनदयाळ ...

ठळक मुद्देराष्ट्रवादीच्या खेड येथील निर्धार परिवर्तन यात्रेत सत्ताधाºयांवर तोफ
खेड : सध्या नावं बदलण्याचा जमाना आहे आणि आता सरकार पेट्रोलचेही नाव आता बदलणार असून त्याचे नाव पंडीत दीनदयाळ उपाध्याय बहुमूल्य तरल पदार्थ असे ठेवले तर यात नवल वाटायचे कारण नाही, असा टोला माजी उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी लगावला.महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेचे शुक्रवारी खेडमध्ये आगमन झाले. यावेळी झालेल्या जाहीर सभेत भुजबळ बोलत होते. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून इतिहासाचा तज्ज्ञ शक्तीकांत दास आणला आहे. अर्थव्यवस्थेची वाट लावली आहे, असा आरोपही छगन भुजबळ यांनी केला. शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी या सरकारकडे पैसे नाहीत परंतु वायफाय देण्यासाठी या सरकारकडे करोडो रुपये आहेत. जनतेला वायफाय हवा की, भाकरी हवी, असा सवाल भुजबळ यांनी केला.मारुतीची आज ‘जात’ काढली जात आहे. निवडणुका आल्या की, यांना प्रभू रामचंद्र आठवतो. प्रभू रामाचा आणि शिवसेनेचा कधी संबंध आला? आता शिवसेना राममंदिर बांधायला निघाली आहे. अरे, साडेतीन वर्षे झोपला होतात का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला. आज गोत्र विचारलं जात आहे. विकासाचा आणि गोत्राचा काही संबंध आहे का? जात, पंथ, गोत्र काढून लोकांना भावनिक बनवायचं काम सुरु आहे. निवडणुका नसतानाही किंवा आचारसंहिता नसतानाही पोलिस शुटींग करीत आहेत. कुणाच्या आदेशावर हे केले जात आहे. आम्ही सत्तेचा दुरुपयोग कधी केला नाही; परंतु मागच्या दाराने ही आणीबाणी आणली जात आहे हा भाजपचा डाव आहे असा आरोपही अजित पवार यांनी केला. येणाºया लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने परिवर्तन करण्याचा निर्धार केला असून जनतेला फसवणाºया भाजप सरकारला घरी बसवण्याचे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथील जाहीर सभेत केले.धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात शिवसेनेवर जोरदार प्रहार केला. शिवसेनेचे मंत्री रामदास कदम आणि अनंत गीते यांच्या कारभारावर जोरदार टीका केली. रामदास कदम यांना ‘दाम’ दास कदम, अशी उपमा दिली. रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनिल तटकरे यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करा आणि परिवर्तन घडवा असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले. या सभेत रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात सेनेच्या कारभारावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, आमदार भास्कर जाधव, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार विद्या चव्हाण, आमदार प्रकाश गजभिये, आमदार संजय कदम, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.बैलगाडीतून प्रवासजाहीर सभेपूर्वी खेड शहरात बैलगाडीतून अजित पवार, सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची मिरवणूक काढण्यात आली. बैलगाडी हाकण्याचे काम विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेचा आजचा दुसरा दिवस असून खेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेवर तोफ डागली.
टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळRatnagiriरत्नागिरीNCPराष्ट्रवादी काँग्रेस