शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिकसह माध्यमिक शाळा बंद करण्याचा सरकारचा घाट, विनायक राऊत यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 16:30 IST

चिपळूण : एकीकडे कोकणसह मुंबईतील मराठी माध्यमाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद करण्याचा घाट सरकारने घातला असून, दुसरीकडे सरकारमधील ...

चिपळूण : एकीकडे कोकणसह मुंबईतील मराठी माध्यमाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद करण्याचा घाट सरकारने घातला असून, दुसरीकडे सरकारमधील लोकप्रतिनिधी धनदांडग्या शैक्षणिक संस्थांचे उद्घाटन करीत आहेत. त्यामुळे गरिबांच्या मुलांचे शैक्षणिकदृष्ट्या नुकसान होणार आहे. त्याकडे दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे. कोकणात उद्धवसेनेकडून मराठी शाळा वाचवा अभियान सुरू केले जाणार असल्याची माहिती माजी खासदार विनायक राऊत यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.राऊत म्हणाले की, सामान्य घरातील मुलांना मोफत शिक्षण आणि आरोग्य सेवा पुरवणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. मात्र १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार कोकणातील शिक्षणाचा बट्ट्याबोळ होणार आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरिबांची मुले प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिकत होती. अशा अनुदानित शाळा राज्य सरकार बंद करणार आहे. शिक्षकांच्या पगारावर होणारा खर्च कमी करण्यासाठी आणि खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना वाव देण्यासाठी सरकारने नवीन धोरण आणले आहे. त्यामुळे सामान्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातील अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद केल्या जाणार नाहीत. केवळ मुंबई आणि कोकणातील अनुदानित शाळा बंद केल्या जाणार आहेत. त्यामुळे या भागातील पालकमंत्र्यांचे आपल्या जिल्ह्याकडे लक्ष आहे की नाही असा प्रश्न पडतो. राज्य सरकारचे हे धोरण म्हणजे हिंदीची सक्ती, इंग्रजीची भरभराट आणि मराठीला हद्दपार करण्याचा प्रयत्न आहे. नव्या संचमान्यतेनुसार जिल्ह्यातील ४२८ माध्यमिक शाळा आणि ५५० प्राथमिक शाळा बंद पडणार आहेत. त्यातून ९७८ शिक्षक अतिरिक्त होतील. यातील काहींचे समायोजन केले जातील. उर्वरित शिक्षक बेरोजगार होणार आहेत, असे ते म्हणाले.डोंगरी भागातील आमच्या मुलांना विशेष सवलत देऊ नका, पण आहे त्या सवलती रद्द करू नका, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, सुधीर शिंदे उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणVinayak Rautविनायक राऊत MahayutiमहायुतीSchoolशाळा