शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
2
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
3
मिचेल स्टार्कचा भेदक मारा, राहुल त्रिपाठी लढला! KKR समोर SRH २० षटकंही नाही टिकला
4
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
5
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
6
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
7
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
8
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
9
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
10
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
11
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
12
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
13
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
14
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

सोन्याची लकाकी, चांदीची चमक ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 2:16 PM

Gold Ratnagiri- सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. तशातच सोने आणि चांदीचे दर दिवसेंदिवस घसरू लागले आहेत. बुधवारी सकाळी सोन्याचा दर दुपारी पुन्हा घसरून ४७ हजारांवर, तर चांदीचा दर ७१,५००पर्यंत खाली आला.

ठळक मुद्देसोन्याची लकाकी, चांदीची चमक ओसरलीचांदीचा दरही एका दिवसात १०००ने खाली

रत्नागिरी : सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. तशातच सोने आणि चांदीचे दर दिवसेंदिवस घसरू लागले आहेत. बुधवारी सकाळी सोन्याचा दर दुपारी पुन्हा घसरून ४७ हजारांवर, तर चांदीचा दर ७१,५००पर्यंत खाली आला.कोरोनाच्या संकटात अनेक उद्योग, व्यवसाय डबघाईस येत असताना त्यांच्यातील गुंतवणूकही घटत गेली. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीच्या खरेदीकडे लोकांचा कल वाढला होता.ग्राहकांचा कल सोने - चांदीच्या खरेदीकडे मोठ्या प्रमाणावर वाढल्याने या धातूंच्या दरात लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढ होत गेली. त्यामुळे चांदी ५४ हजार रुपये प्रतिकिलोवरून थेट ७,५०० रुपयांची वाढ होऊन ती ६१ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. दोन आठवड्यात चांदीमध्ये पुन्हा १० हजार रुपयांची वाढ झाली आणि चांदी ७२ हजारांपर्यंत पोहोचली. लॉकडाऊनपूर्वी चांदी ५०,५०० वर होती, तर सोने ४० हजार रुपयांवर होते.त्यानंतरही सोने, चांदीच्या दरात कमी जास्त प्रमाणात वाढ होत गेली असली तरी सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा घसरण सुरू झाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास सुरुवात होताच सोने - चांदीच्या दरात वाढ झाली. चांदी ७५,५०० वर, तर सोने ५०,५०० वर पोहोचले. मात्र, यादरम्यान आयात शुल्क कमी केल्याची घोषणा होताच चांदी ७४ हजारांवर आणि सोने ४९,५०० पर्यंत खाली आले.गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात लक्षणीय घट होऊ लागली आहे. १ फेब्रुुवारी रोजी ४९,५००पर्यंत वर गेलेले सोने आता ४७ हजारांवर आले आहे, तर चांदीचा दरही प्रतिकिलो ७१,५०० पर्यंत आला आहे.बुधवारी दिवसभरात दोन वेळा या दोन्हीही धातुंच्या दरात घट झाली. मंगळवारी सोन्याचा दर प्रतिग्रॅम ४७०० इतका होता, तर चांदी प्रतिकिलो ७१००० हजार एवढी होती. बुधवारी सकाळी सोन्याचा दर ५०० रुपयांनी घसरून तो ४७,२०० झाला, तर चांदीचा दर १५०० रुपयांनी वाढून ७२,५०० झाला. मात्र, दुपारी पुन्हा दर घसरून सोने ४७,०००वर, तर चांदी ७१,५०० रुपयांवर आली.गुंतवणूक म्हणूनअमेरिकन बँकांसह विदेशातील विविध बँकांनी गुंतवणुकीवरील व्याजदर शून्य केल्याने लोक गुंतवणूक म्हणून सोने, चांदी खरेदीवर विशेष भर देऊ लागले. त्यामुळेच सध्या सोने-चांदीचे दर दिवसेंदिवस वाढू लागले आहेत.

टॅग्स :GoldसोनंRatnagiriरत्नागिरी