चिपळुणात गोवा बनावट मद्याच्या रॅकेटचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST2021-07-03T04:20:38+5:302021-07-03T04:20:38+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : चिपळूणकडून सुरळकडे येत असलेल्या हुंडाई क्रेटा कारमध्ये गोवा बनावटीच्या मद्याचे ३६ बॉक्स आढळले. गोवा ...

Goa fake liquor racket exposed in Chiplun | चिपळुणात गोवा बनावट मद्याच्या रॅकेटचा पर्दाफाश

चिपळुणात गोवा बनावट मद्याच्या रॅकेटचा पर्दाफाश

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : चिपळूणकडून सुरळकडे येत असलेल्या हुंडाई क्रेटा कारमध्ये गोवा बनावटीच्या मद्याचे ३६ बॉक्स आढळले. गोवा राज्यातील मद्य व वाहनासह १४ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली असून, याप्रकरणी चिपळूणमधील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गुहागर - विजापूर राष्ट्रीय महामार्गावर चिपळूणकडून गुहागरकडे गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती प्रभारी अधीक्षक वैभव वैद्य यांना मिळाली होती. त्यानुसार विभागीय उपआयुक्त वाय. एम. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व वैभव वैद्य यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक किरण पाटील, सत्यवान भगत, विशाल विचारे व सागर पवार यांनी सापळा रचला होता. त्यानुसार या वाहनामधील विपुल वसंत कांबळी (२९, रा. पागनाका गोपाळकृष्णवाडी, चिपळूण) व शुभम दयानंद चव्हाण (२२, रा. मार्कंडी, चिपळूण) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता, या वाहतुकीसाठी मदत करणाऱ्या अमेय चंद्रकांत बोंडकर (३४, रा. पागनाका, चिपळूण) यालाही ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी अधीक्षक वैद्य, निरीक्षक शरद जाधव, सुरेश पाटील, शंकर जाधव, दुय्यम निरीक्षक सुनील सावंत, सत्यवान भगत, किरण पाटील, निखील पाटील व जवान विशाल विचारे, सागर पवार, अतुल वसावे, अर्षद शेख यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक किरण पाटील करत आहेत.

-------------------------------

आठवडाभरात लाखोंचा माल जप्त

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाईन शॉप बंद होते. त्यामुळे गोवा बनावटीच्या मद्याचे रॅकेट सक्रिय झाले होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्याचा वेळोवेळी पर्दाफाश केला. आठवडाभरात चार मोठ्या कारवाई करून लाखोंचा माल जप्त केला. रत्नागिरी शहर, गुहागर-नरवण, लोटे व चिपळूण येथेही कारवाई करत लाखो रुपये किमतीच्या मद्यासह वाहने व अन्य मुद्देमाल जप्त केला आहे.

--------------------

राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने चिपळुणात गाेवा बनावटीच्या मद्याचा साठा जप्त केला.

Web Title: Goa fake liquor racket exposed in Chiplun