शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील गांजा विक्रीत युवतीचा समावेश, आतापर्यंत चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 13:01 IST

रॅकेट असण्याचा संशय

रत्नागिरी : शहरानजीकच्या शांतीनगर येथे गांजा विक्रीचा पर्दाफाश केल्यानंतर गांजा पुरवठ्यात एका १९ वर्षीय युवतीचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पाेलिसांनी तिच्यासह अन्य एकाला अटक केली आहे. प्रेरणा साठे (रा. मूळ रा. कारवांचीवाडी, सध्या रा. माळनाका, रत्नागिरी) व मतीन डोंगरकर (३५, मूळ रा. कोकणनगर, सध्या माळनाका) अशी त्यांची नावे आहेत. या गांजा विक्री प्रकरणात पाेलिसांनी आत्तापर्यंत चाैघांना अटक केली आहे.ही कारवाई रत्नागिरी शहरानजीकच्या शांतीनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमाेरील रस्त्यावर गुरूवारी (१६ फेब्रुवारी) सायंकाळी ७:३० वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली हाेती. याठिकाणी गांजाची विक्री हाेणार असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी या भागात सापळा रचला हाेता.

रस्त्यावर एका रिक्षाबाबत पाेलिसांना संशय आला. त्यांनी ती थांबवून तपासणी केली. या तपासणीत आठ प्लास्टिकच्या पुरचुंडीमध्ये ५५ हजारांचे अमली पदार्थ आढळले हाेते. मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी प्रवीण परब आणि ओमकार बोरकर या दाेघांना अटक केली होती, तर त्यांची अमली पदार्थ असलेली रिक्षाही पोलिसांनी जप्त केली होती.दोघांकडे चौकशी केल्यानंतर गांजा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती अन्य असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी दिलेल्या माहितीत १९ वर्षीय युवती गांजा पुरवण्याचा व्यवसाय करत असल्याचे समाेर आले. पाेलिसांनी अटक केलेली प्रेरणा साठे ही मतीन डोंगरकर याच्या सोबत माळनाका येथे एका इमारतीत भाड्याचा फ्लॅट घेऊन राहत होती. तेथूनच दोघे गांजा मागवून त्याचा पुरवठा शहरातील अन्य तरुणांना करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रॅकेट असण्याचा संशयगांजा विक्रीप्रकरणी पाेलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. एका युवतीचा यामध्ये समावेश असल्याचे समाेर येताच अन्य काेणी त्यांच्या संपर्कात आहेत का, याचा शाेध आता पाेलिस घेत आहेत. यामध्ये रॅकेट असण्याचा संशय व्यक्त हाेत असून, अन्य काही धक्कादायक बाबी उघड हाेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस