शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांची एस. टी. बस होणार आता पोलादी, १३०० नवीन लालपरी दाखल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 13:42 IST

आरामदायी व आलिशान प्रवासाच्या शिवशाहीनंतर रत्नागिरी विभागाच्या ताफ्यात अ‍ॅल्युमिनियम बांधणीऐवजी माईल्ड स्टील पोलादी बांधणीच्या लालपरी दाखल झाल्या आहेत. येत्या वर्षभरात महाराष्ट्रातील तीस विभागात एकूण १३०० नवीन लालपरी दाखल होणार आहेत. त्यापैकी रत्नागिरी विभागात ५0 ते ६0 गाड्या दाखल होणार आहेत.

ठळक मुद्देसर्वसामान्यांची एस. टी. बस होणार आता पोलादीराज्य परिवहन महामंडळ , रत्नागिरीच्या ताफ्यात ५० लालपरी

मेहरून नाकाडे 

रत्नागिरी : आरामदायी व आलिशान प्रवासाच्या शिवशाहीनंतर रत्नागिरी विभागाच्या ताफ्यात अ‍ॅल्युमिनियम बांधणीऐवजी माईल्ड स्टील पोलादी बांधणीच्या लालपरी दाखल झाल्या आहेत. येत्या वर्षभरात महाराष्ट्रातील तीस विभागात एकूण १३०० नवीन लालपरी दाखल होणार आहेत. त्यापैकी रत्नागिरी विभागात ५0 ते ६0 गाड्या दाखल होणार आहेत.

पारंपरिक अ‍ॅल्युमिनियमऐवजी हलके परंतु मजबूत अशा माईल्ड स्टीलचा वापर गाडीच्या बांधणीसाठी करण्यात आला आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणेजवळील दापोडी कार्यशाळेत मजबूत स्टील बांधणीच्या बसेसची निर्मिती करण्यात आली आहे. प्रवासी सुरक्षिततेला प्राधान्य देत या गाडीची निर्मिती करण्यात आली आहे.एस. टी.च्या साध्या गाडीचे रूपांतर लालपरीमध्ये करण्यात आले आहे. या एस. टी.च्या बांधणीमध्ये अ‍ॅल्युमिनियमऐवजी हलके पोलाद वापरल्याने बसच्या खिडक्यांचा धडधड आवाज येत नाही. ४२ आसनी बस असलेल्या या गाडीला संकटकालीन दोन मार्ग आहेत.

संकटकालीन खिडक्यांच्या जागी असलेली आसने काढण्यात आली आहेत. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत पुढे व मागे असे दोन मार्ग प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियमावलीनुसार लालपरीची बांधणी करण्यात आली आहे.एस. टी.ची साधी गाडी साडेसहा वर्षे वापरल्यानंतर ती लालपरीमध्ये रूपांतरीत करण्यात आली आहे. सध्या दापोडी (पुणे), नागपूर व औरंगाबाद कार्यशाळेत लालपरीची बांधणी करण्यात येत आहे. रत्नागिरी विभागात सध्या १५ लालपरी दाखल असल्या तरी त्या आंतरराज्य मार्गावर चालविण्यात येत आहेत.

एशियाडप्रमाणे या गाडीतील बैठक व्यवस्था आरामदायी आहे. टू बाय टू आसनी बैठक व्यवस्था आहे. सरकत्या काचांच्या खिडक्या असून, आकारानेही मोठ्या आहेत. चालकाची केबीनही प्रशस्त असून, चालकाशेजारीच वाहकाची सीट आहे. चालकासमोरील काच लक्झरीप्रमाणे मोठी आहे.लालपरीचा दरवाजा पुढच्या बाजूला असून, बसची अंतर्गत रचनादेखील आकर्षक आहे. त्यासाठी अ‍ॅक्रेलिक शीटचा वापर करण्यात आला आहे. लक्झरीबसप्रमाणे सामान सुविधा एस. टी.च्या मागच्या बाजूला सुरक्षित करण्यात आली आहे. त्यामुळे एस. टी.च्या टपावर सामान ठेवणे कालबाह्य होणार आहे.

सुरक्षिततेची खबरदारी म्हणून दोन अग्निशमन उपकरणे बसमध्ये ठेवण्यात आली आहेत. पूर्वीप्रमाणे बसचा मार्ग दाखविणारे बोर्ड आता पत्र्याऐवजी एईडी दिव्यांचे आहेत. संपूर्ण बसची बांधणी करतानाच प्रवांशाच्या सुरक्षिततेचा विचार करण्यात आला आहे.आरामदायी गाड्याखासगी प्रवासी वाहतुकीला तोंड देण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शिवशाही गाड्या सेवेत आणल्या. आरामदायी प्रवास, वायफाय सुविधामुळे ही गाडी प्रवाशांना भावली असून, प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला. खासगी कंपनीकडून महामंडळाने १५०० गाड्या चालविण्यासाठी घेतल्या. परंतु व्यवस्थापनातील त्रुटींमुळे शिवशाहीबद्दल प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या.

शिवशाहीमुळे एस. टी.ला फायद्याऐवजी तोटाच अधिक होत असल्याचे लक्षात येताच महामंडळाने आता स्वत:च्याच शिवशाही बसेस आणण्याचे ठरविले असून, तशा पध्दतीने बांधणी केलेल्या आरामदायी गाड्या काही दिवसातच महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.गतवर्षी शिवशाहीवगळता प्रायोगिक तत्त्वावर लालपरी रत्नागिरी विभागाच्या ताफ्यात दाखल झाल्या होत्या. त्या लालपरीला प्रवाशांनी पसंती दर्शविल्याने येत्या तीन वर्षात ८० टक्के लालपरी असणार आहेत. येत्या वर्षभरात महाराष्ट्रातील तीस विभागात एकूण १३०० नवीन लालपरी दाखल होणार आहेत.

सध्या महामंडळाच्या तीन कार्यशाळांतून माईल्ड स्टील गाड्यांची बांधणी सुरू आहे. जसजशा गाड्या तयार होतील, त्याप्रमाणे प्रत्येक विभागाच्या मागणीनुसार दिल्या जाणार आहेत. टप्प्याटप्प्याने लालपरी दाखल होणार आहेत.- विजय दिवटे,प्रभारी विभाग नियंत्रक, रत्नागिरी.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळRatnagiriरत्नागिरी