शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गॅसवाहू टँकर उलटला, मुंबई-गोवा महामार्ग १५ तास बंद; रत्नागिरीनजीकच्या हातखंबा येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 15:39 IST

गॅस गळती झाल्याने स्थानिक रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा गावाजवळ सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास एलपीजी वाहून नेणारा टँकर भरवस्तीत उलटल्याने मोठी खळबळ उडाली. महामार्गावरील वाहतूक १५ तास पूर्णपणे ठप्प झाली. या अपघातात टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याने स्थानिक रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. गॅस दुसऱ्या टँकरमध्ये काढून अपघातग्रस्त टँकर हटवल्यानंतर मंगळवारी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास वाहतूक सुरू झाली. तोपर्यंत दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे एलपीजी भरुन हा टँकर कोल्हापूरकडे निघाला होता. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तो हातखंबा येथील एका वळणावर उलटला आणि त्यातून गॅसची गळती सुरू झाली. टँकर उलटताना मोठा आवाज झाल्याने असंख्य लोक तेथे गोळा झाले. गॅसची गळती होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने सर्वजण बाजूला झाले. दरम्यान रत्नागिरी ग्रामीण पोलिस, हातखंबा वाहतूक शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले.सर्वात प्रथम आसपास राहणाऱ्या सुमारे १०० लोकांना महामार्गावरील एका हॉटेलमध्ये स्थलांतरीत करण्यात आले. तोपर्यंत जिल्हा प्रशासन आणि पाेलिस प्रशासनाने गॅसची गळती रोखण्यासाठी पावले उचलली. एमआयडीसीची रेस्क्यू टीम तेथे बोलावण्यात आली. या टीमने अथक प्रयत्न करुन गॅस गळती थांबवली. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.त्यानंतर दुसरा टँकर आणून त्यात अपघातग्रस्त टँकरमधील गॅस काढून घेण्यात आला. हे दोन महत्त्वाचे टप्पे पार पडल्यानंतर अपघातग्रस्त टँकर क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आला. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही सर्व प्रक्रिया संपली. त्यानंतर सव्वादोन वाजण्याच्या सुमारास वाहतूक सुरू करण्यात आली. तोपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे थांबवून हलक्या वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्यात आले होते.