शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
2
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
3
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
4
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
5
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
6
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
7
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
8
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
9
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
10
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
11
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
12
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
13
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
14
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
15
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
16
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
17
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
18
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
19
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
20
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: मिनीबसला धडक दिलेल्या टँकरमधून गॅस गळती; ३० शिक्षक जखमी, दोन गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 13:34 IST

रत्नागिरी : जयगडहून मुंबईच्या दिशेने एलपीजी गॅस घेऊन जाणाऱ्या टँकर चालकाने नियंत्रण सुटून मिनी बसला समाेरून जाेरदार धडक दिल्याची ...

रत्नागिरी : जयगडहून मुंबईच्या दिशेने एलपीजी गॅस घेऊन जाणाऱ्या टँकर चालकाने नियंत्रण सुटून मिनी बसला समाेरून जाेरदार धडक दिल्याची घटना रविवारी सकाळी मुंबई-गाेवा महामार्गावरील निवळी (ता. रत्नागिरी) येथे घडली. या अपघातात चालकासह ३१ जण जखमी झाले आहेत. त्यातील दाेघांची प्रकृती गंभीर आहे. अपघातात जखमी झालेले सर्व शिक्षक आहेत. या अपघातानंतर टँकर चालक फरार झाला असून, सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत करण्यात आलेली नव्हती.एलपीजी गॅस घेऊन टँकर (एनएल ०१, एन ४६२८) हा जयगड येथून मुंबईकडे चालला होता. तो सकाळी ८:४५ वाजण्याच्या दरम्यान निवळी येथील बावनदीच्या अलीकडील उतारावर आला असता चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी तो समोरून येणाऱ्या मिनी बसवर (एमएच ०२, ईआर ९६०३) आदळला. या बसमधून चिपळूण येथून शिक्षक प्रशिक्षणासाठी रत्नागिरीत येत हाेते. टँकरच्या धडकेने ही बस २५ ते ३० फूट खोल दरीत जाऊन उलटली. जखमींना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून व अन्य १०८ रुग्णवाहिकेतून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.या अपघाताची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकाचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले हाेते. त्यांनी जखमींना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात पाठवून दिले, तसेच पाेलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह उपविभागीय पाेलिस अधिकारी नीलेश माईनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या मार्गावरील वाहतूक सायंकाळी उशिरापर्यंत सुरू करण्यात आली नव्हती.

जखमींची नावेमिनी बस चालक संकेत कृष्णकांत जागुष्टे (वय २८, रा. कुटरे, चिपळूण), विराज राजाराम सावंत (वय ४१, रा. सावर्डे), स्मिता मधुकर पाटील (वय ४८, दहिवली, चिपळूण), उषा अमोल खुडे (वय ३१, रा. खेर्डी, चिपळूण), जयश्री सूर्यकांत गावडे (वय ५४, रा. सावर्डे), प्रियंका दिलीप जाधव (वय ३८, रा. सावर्डे), नेहा संतोष मेस्त्री (वय ४१, रा. सावर्डे), धर्मेंद्र दत्तात्रय दाेरुगडे (वय ५३, रा. चिपळूण), दिलीप ज्ञानेश्वर डोंगरे (वय ५३, रा. सावर्डे), सुलक्षणा संभाजी पाटील (वय ४०, रा. चिपळूण), निशिकांत दीनानाथ वानकर (वय ५१, रा. सावर्डे), वृषाली सूर्यकांत यादव (वय ५०, रा. खेर्डी), श्वेता संजय चव्हाण (वय ४८, रा. चिपळूण),

हर्षाली हेमंत पाकळे (वय ३६, निवळी, रत्नागिरी), नीता विनायक बांद्रे (वय ३९, रा. गाेवळकाेट, चिपळूण), मीना सुभाष घाडगे (वय ५२, रा. चिपळूण), कमलकिशोर किसान महाडिक (वय ३७, रा. चिपळूण), प्रेमकुमार बबन शिवगण (वय ४४, रा. चिपळूण), अमोल गणेश कोतवाल (वय ३५, रा. खेर्डी), मनीषा संतोष कांबळी (वय ४७, रा. खेर्डी), मालिनी दीपक चव्हाण (वय ४०, धारतळे), श्वेता संजय चव्हाण (वय ४८, रा. चिपळूण), राजेश यादव (वय ४७, रा. सावर्डे), गणेश महादेव सावर्डेकर (वय ४५, रा. सावर्डे), सुरेंद्र दीपक सावंत (वय ४०, चिपळूण), सचिन अशोक पाेकळे (वय ४३, रा. सावर्डे), उदय पांडुरंग खताते (वय ५२, रा. चिपळूण), अरविंद अनंत सपकाळ (वय ४६, रा. चिपळूण), रूपाली भुवड (वय ३९, रा. चिपळूण).

गंभीर जखमीमंदा सुकदेव खाडे (वय ५३, रा. सावर्डे, चिपळूण) यांना काेल्हापूर येथे, तर मीना विनायक शिरकर (वय ३८, चिपळूण) यांना रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाणी मारून गॅस डायलाेटगॅस गळतीनंतर लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. तसेच गॅस गळती थांबवण्यासाठी माहीतगार नीलेश भोसले व अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले हाेते. टॅंकरमधील गॅस दुसऱ्या टॅंकरमध्ये ट्रान्स्फर करण्याचे प्रयत्न असफल झाल्याने टाकीवर पाणी मारून ताे डायलाेट करण्याचे काम सुरू हाेते.

जनावराचा होरपळून मृत्यूभारत पेट्रोलियमची गॅसची गळती झाल्याने परिसरातील एका गोठ्याला आग लागली. त्यामध्ये एका जनावराचा होरपळून मृत्यू झाला आहे.

वाहतूक वळवलीअपघातस्थळी गॅस गळती होत असल्याने वाहतूक पोलिसांनी एक किलोमीटर परिसरातील वाहने थांबवून ठेवली हाेती, तसेच या मार्गावर गाेव्यावरून येणारी वाहने पाली व उक्षीमार्गे, तर मुंबईहून येणारी वाहने संगमेश्वरमार्गे वळवण्यात आली आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गAccidentअपघातTeacherशिक्षक