गणपतीपुळे : गणपतीपुळे समुद्रात लाटांबरोबर पोहत जात खोल पाण्यात अडकलेल्या दोघा पर्यटकांना मोरया स्पोर्टसच्या जेट स्की चालकांनी वेळीच माघारी आणल्यामुळे दुर्घटना टळली. बेळगावमधील हे दोघे पर्यटक होते. हा प्रकार काल, गुरुवारी घडला.उन्हाळी सुट्ट्यांमुळे गणपतीपुळेसह जिल्ह्यातील समुद्रकिनारी भागामध्ये पर्यटकांनी गर्दी केली आहे. गणपतीपुळे येथे 'श्रीं'चे दर्शन घेतल्या नंतर पर्यटकांची पावले किनाऱ्याकडे धाव घेतात. असेच बेळगावातील दोघे पर्यटक पोहण्यासाठी समुद्रात उतरले होते. पोहताना लाटांबरोबर ते खोल समुद्रात जाऊ लागले.ही बाब किनाऱ्यावरील जीवरक्षक अक्षय माने, अनिकेत चव्हाण, विक्रम राजवाडकर, आशिष मोने यांच्या निदर्शनास येताच त्यांनी समुद्राच्या दिशेने धाव घेतली. मात्र त्याचवेळी किनाऱ्यावर असलेल्या मोरया स्पोर्टस्च्या एका जेट स्की चालकाने प्रसंगावधान राखत त्या दोघांना सुरक्षितरित्या पुन्हा किनाऱ्याकडे आणले. वेळीच त्या दोघांना बाहेर काढल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
गणपतीपुळेत समुद्रात खोल पाण्यात अडकलेल्या दोन पर्यटकांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 12:32 IST