Ganpati Festival रत्नागिरी : मुंबई प्रवासासाठी१ हजार ३६६ जादा गाड्यांचे आरक्षण - भाविकांचा परतीचा प्रवास सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 15:53 IST2018-09-18T15:45:30+5:302018-09-18T15:53:10+5:30
सोमवारी गौरी-गणपतींचे विसर्जन करून भाविक मुंबई प्रवासाला निघाले आहेत. रत्नागिरी विभागातून १५८ गाड्या सोमवारी मुंबईकडे रवाना झाल्या.

Ganpati Festival रत्नागिरी : मुंबई प्रवासासाठी१ हजार ३६६ जादा गाड्यांचे आरक्षण - भाविकांचा परतीचा प्रवास सुरु
रत्नागिरी : सोमवारी गौरी-गणपतींचे विसर्जन करून भाविक मुंबई प्रवासाला निघाले आहेत. रत्नागिरी विभागातून १५८ गाड्या सोमवारी मुंबईकडे रवाना झाल्या. दिनांक २४ सप्टेंबरपर्यंत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, मंगळवारी सर्वाधिक गाड्या परतीसाठी सोडण्यात येणार आहेत. मंगळवारसाठी ६६६ गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे.
मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभाग सज्ज झाला असून, सोमवारपासूनच जादा गाड्या सुरू झाल्या आहेत. एकूण १ हजार ३६६ जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले असून, ग्रुप बुकिंगच्या २४४ गाड्यांचा त्यामध्ये समावेश आहे.
मुंबई व उपनगरातील आगारातून जादा एस. टी. बसेस जिल्ह्यात आल्या होत्या. सोमवारी मुंबईसाठी ३८, बोरीवली ५०, कल्याण ८, ठाणे २२, भांडुप ७, विठ्ठलवाडी ३, नालासोपारा १०, विरार ३, पुणे १६, मिळून एकूण १५७ आरक्षित व एक गु्रप बुकिंग अशा एकूण १५८ जादा गाड्या रवाना झाल्या. परतीच्या प्रवासासाठी २४ सप्टेंबरपर्यंत नियोजन केले असले तरी सर्वाधिक गाड्या मंगळवार, १८ रोजी रवाना होणार आहेत.
मुंबईसाठी ११५, परेल ९, बोरीवली १८९, कल्याण २२, ठाणे ६२, भांडुप १७, विठ्ठलवाडी २२, नालासोपारा ४१, भार्इंदर १, विरार ११, पुणे ३२ व इतर २ मिळून ५२३ गाड्यांचे आरक्षण प्रवाशांनी केले आहे