सहा महिन्यांच्या कालखंडानंतर राजापुरात गंगेचे आगमन, अनेकांनी लुटला स्नानाचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 18:01 IST2017-12-06T17:58:28+5:302017-12-06T18:01:33+5:30
विज्ञानाला आव्हान ठरत समस्त भाविकांच्या श्रध्दास्थानी असलेल्या राजापूरच्या गंगेचे बुधवारी सकाळी ६ वाजता आगमन झाले. यापूर्वी ७ मे रोजी अवतीर्ण झालेली गंगा १९ जूनला अंतर्धान पावली होती. त्यानंतर केवळ सहा महिन्यांच्या कालखंडानंतर गंगेचे आगमन झाले आहे. गंगेच्या आगमनाची वार्ता समजताच अनेकांनी गंगातीर्थ क्षेत्री जाऊन स्नानाचा आनंद लुटला.

सहा महिन्यांच्या कालखंडानंतर राजापुरात गंगेचे आगमन, अनेकांनी लुटला स्नानाचा आनंद
राजापूर : विज्ञानाला आव्हान ठरत समस्त भाविकांच्या श्रध्दास्थानी असलेल्या राजापूरच्या गंगेचे बुधवारी सकाळी ६ वाजता आगमन झाले. यापूर्वी ७ मे रोजी अवतीर्ण झालेली गंगा १९ जूनला अंतर्धान पावली होती. त्यानंतर केवळ सहा महिन्यांच्या कालखंडानंतर गंगेचे आगमन झाले आहे. गंगेच्या आगमनाची वार्ता समजताच अनेकांनी गंगातीर्थ क्षेत्री जाऊन स्नानाचा आनंद लुटला.
पावसाळा संपला की साधारणपणे नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात उष्ण वारे वाहू लागले की, गंगा आगमनाचे वेध लागतात. गेले काही दिवस उष्ण वारे वाहू लागल्याने गंगेच्या आगमनाची चाहूल लागली होती. यापुर्वी दर तीन वर्षांनी गंगेचे आगमन व्हायचे त्यानंतर काही दिवसांच्या वास्तव्यानंतर ती अंतर्धान पावत होती. मात्र, अलिकडच्या तिच्या आगमन व गमन या नियमित कालखंडाला छेद गेला आहे.
काही वर्षे तर ती सलग आली होती आणि तिच्या वास्तव्याला कालावधीही खूपच लांबला होता. दिनांक ३१ आॅगस्ट २०१६ साली गंगा अवतीर्ण झाल्यानंतर ७ मे २०१७ मध्ये अंतर्धान पावली होती. त्याला सहा महिन्यांचा कालावधी उलटत असतानाच गंगेचे पुन्हा आगमन झाले आहे. गंगाक्षेत्रावरील सर्वात मोठे असणारे काशिकुंड तुडुंब जलाशयाने भरले आहे. गोमुखातून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाहदेखील वाढला आहे.
निसर्गाच्या रचनेत किंवा भूगर्भात काही घडामोडी घडल्या तरीही गंगेचे आगमन झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. २६ जानेवारी २००१ मध्ये गुजरातच्या भूज, कांडला परिसराला भूकंपाचा मोठा दणका बसला होता. त्यावेळी गंगेचे आगमन झाले होते. ज्यावेळी त्सुनामीचा तडाखा भारत, इंडोनेशियासहित जगाला बसला होता. त्यावेळीही गंगा अचानक अवतीर्ण झाली होती.