शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
2
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
3
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
4
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
5
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
6
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
7
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
8
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
9
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
10
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
11
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 
12
बेपत्ता झालेल्या राजा आणि सोनमची करण्यात आली होती रेकी, दुचाकीचे लोकेशन आले समोर
13
Nirjala Ekadashi 2025:निर्जला एकादशीचा उपवास, करा साबुदाण्याची खमंग- कुरकुरीत भजी!
14
३ वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार; २४ तासांत पोलिसांनी नराधमाला यमसदनी धाडले
15
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा एकत्र होणार का? सुनील तटकर म्हणाले, 'तसा विषय..."
16
Chenab Railway Bridge: आयफेल टॉवरपेक्षाही उंच! मोदींच्या हस्ते चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन
17
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
18
मस्क-ट्रम्प वादात स्टारलिंकसाठी मोठी बातमी! भारताने लायसन्स दिले...
19
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
20
IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...

Ratnagiri- सावधान!, परशुराम घाटातील 'गॅबियन वॉल' घसरतेय!, ग्रामस्थ पुन्हा भीतीच्या छायेत

By संदीप बांद्रे | Updated: June 3, 2025 17:49 IST

कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

संदीप बांद्रे

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत परशुराम घाटातील धोकादायक दरडींच्या सुरक्षिततेच्या उपायोजनांच्या दृष्टीने लोखंडी जाळी व गॅबियन वॉल उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, गॅबियन वॉल घसरण्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून गॅबियन उभारणीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे समोर आल्याने या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून परशुराम घाटातील धोकादायक स्थिती कायम चर्चेत राहिली आहे. या घाटात एका बाजूला २२ मीटर उंचीच्या दरडीचा भाग असल्याने या ठिकाणी पावसाळ्यात नियमित घडणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर धोकादायक दरडीच्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून लोखंडी जाळी बसवली जात आहे. हे लोखंडी जाळी बसवण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. तर दुसरीकडे गेल्या पावसात कोसळलेल्या संरक्षण भिंतीच्या बाजूने गॅबियन वॉल उभारण्याचे काम देखील वेगाने सुरू आहे.  काही दिवसांपूर्वी येथे मान्सूनपूर्व पावसाने जोर धरल्याने ही कामे थांबली होती. आता पुन्हा या कामाने वेग घेतला असला, तरी गॅबियन वॉल घसरत असल्याचे मंगळवारी समोर आल्याने पुन्हा एकदा परशुरामवासीयांना व महामार्गावरील वाहतूकदारांना धडकी भरली आहे. या घाटातील निकृष्ट कामाचा नमुना समोर आला असल्याने या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहत असून पुन्हा एकदा सावधान, परशुराम घाटातील 'गॅबियन वॉल' घसतेय, असे म्हणायची वेळ आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गMumbaiमुंबईgoaगोवा