शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दुखवायचे नसल्याने त्यांच्याशी युती केली; CM फडणवीसांनी सांगितली Inside Story
2
भाजप-काँग्रेस नगरसेवकांचा घरोबा; आधी अभद्र युती, नंतर डॅमेज कंट्रोल, अखेर कारवाई
3
“काँग्रेसचे खासदार बिनविरोध आले तेव्हा लोकशाही धोक्यात आली नाही का?”: CM देवेंद्र फडणवीस
4
अजित पवार ताणताहेत, भाजप सहन करतंय; पण का?; काका-पुतण्याच्या जोडीला मूकसंमती? 
5
देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंच्या सभांना उमेदवारांची सर्वाधिक मागणी; सभा, रोड शोंचा कल्ला सुरू
6
काही लोकांचा विकास नव्हे, तर खुर्ची हा एकच अजेंडा आहे; शिंदेंची ठाकरे बंधूंवर घणाघाती टीका
7
घडामोडींना वेग, काँग्रेसकडून कारवाईचा बडगा; आता अंबरनाथमधील ‘ते’ १२ नगरसेवक भाजपमध्ये येणार
8
विरोधी पक्षनेतेपद नाहीच, आता प्रतोदांचा मंत्रिपदाचा दर्जाही जाणार; सरकारची सदस्य संख्येची अट
9
डॉन अरुण गवळीच्या दोन्ही मुली करोडपती; प्रतिज्ञापत्रातून उमेदवारांच्या मालमत्तेची माहिती उघड
10
अधिकाऱ्यांवरील कारवाईचा चेंडू आयोगाच्या कोर्टात; ६ बिनविरोध उमेदवारांप्रकरणी अहवाल सादर
11
भारत देणार सर्वांना धक्का; वृद्धिदर ७.४ टक्के राहणार, सरकारने जाहीर केली आकडेवारी
12
शिंदेसेना उमेदवाराच्या पोटात चाकू खुपसला; वांद्रे येथे प्रचार करताना झाला जीवघेणा हल्ला
13
"आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही, पण जो..."; मंत्री नितेश राणेंनी दिली उघड धमकी
14
काळजाचा थरार! ११ वर्षीय शिवमनं बिबट्याच्या हल्ल्यातून ९ वर्षीय बहीण स्वरांजलीला वाचवले
15
वेदा‍ंता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचं निधन
16
अमेरिका-रशियात तणाव वाढला! व्हेनेझुएलाहून जाणारा रशियन तेल टँकर US नौदलाने जप्त केला
17
उल्हासनगरातील गुंडाराज संपवून शहराचा चेहरामोहरा बदलणार; CM देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर?
18
मतदानापूर्वीच मनसेत मोठा भूकंप होणार?; भाजपा-शिंदेसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत
19
मासेमारी करताना समुद्रात पडला खलाशी; ४ दिवसांनी मध्यरात्री 'असं' काय घडलं, कुटुंबाला बसला शॉक
20
पुण्यात 'पाताळ लोक' तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अख्खा प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागात नोकरी लावतो सांगून अकरा लाखांचा गंडा, एका बँक खातेदारासह तिघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 14:35 IST

पुन्हा फाेन केलास तर बघून घेईन

रत्नागिरी : आराेग्य विभागात नाेकरी लावताे सांगून दाेघांना तब्बल ११ लाख ३९ हजार ५११ रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी वर्तकनगर (ठाणे) येथील एका बँक खातेधारकासह तिघांवर रत्नागिरी ग्रामीण पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या फसवणुकीबाबत उमेश शांताराम धनावडे (वय ३३, रा. करबुडे-मासेबाव, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हा प्रकार २७ जानेवारी २०२२ ते २७ ऑक्टाेबर २०२५ या कालावधीत घडला आहे. या फसवणुकीप्रकरणी समीर म्हस्के (पूर्ण नाव माहीत नाही), बँक खातेधारक राेहित प्रकाश म्हसकर व अन्य एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर म्हस्के याने उमेश धनावडे यांचा भाऊ तुषार शांताराम धनावडे व अन्य मित्र अजय विजय गाेवळकर यांना आराेग्य विभागामध्ये नाेकरी लावताे, त्याठिकाणी पैसे भरावयास लागतील, असे सांगितले.त्यानुसार उमेश धनावडे यांनी ठाणे येथील वर्तकनगरमधील जनता सहकारी बँकेतील राेहित म्हसकर याच्या खात्यावर ६,८६,५६१ रुपये पाठविले. तसेच वाडीतील मित्राच्या माेबाइलवरून राेहित म्हसकर याच्या अभ्युदया काे. ऑप. बँकेच्या खात्यावर ९३,९५० रुपये आणि त्यानंतर दि. १३ मे २०२४ ते दि. १० जून २०२४ या कालावधीत एकूण १ लाख ८७ हजार रुपये पाठविले. त्यानंतर अनाेळखी महिलेने राेहित म्हसकर याच्या खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले असता फिर्यादी यांनी १० हजार रुपये पाठविले.त्यानंतर पुन्हा समीर म्हस्के याने फाेन करून पैसे पाठविण्यास सांगितल्याने १ लाख ६२ हजार रुपये पाठविण्यात आले. नाेकरीच्या आमिषाने तब्बल ११ लाख ३९ हजार ५११ रुपये देण्यात आले. मात्र, तीन वर्षे नाेकरीचा काेणताच पत्ता नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी रत्नागिरी ग्रामीण रुग्णालयात फिर्याद दिली असता, पाेलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पुन्हा फाेन केलास तर बघून घेईनआपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी उमेश धनावडे यांनी समीर म्हस्के याच्याकडे विश्वासाने पाठविलेले पैसे परत मागितले. त्यावर त्याने ‘मी देणार नाही, पुन्हा फाेन केलास तर बघून घेईन,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Job scam in health department: Three booked for 1.1 million fraud

Web Summary : Three individuals, including a bank account holder, have been booked for allegedly defrauding two people of ₹1.1 million with promises of jobs in the health department. The victims were lured into depositing money into bank accounts over a period of time, only to realize they were scammed when no job materialized.