शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संगमेश्वरात टेम्पो दरीत कोसळून अपघात, चारजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 17:35 IST

मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर रामकुंड येथील अवघड वळणाजवळ पिकअप टेम्पो दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी ७.४५ वाजण्याच्या दरम्याने घडली. या अपघातात ४ जण जखमी झाले असून, जखमींवर संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ग्रामस्थांच्या मदतीने जखमी झालेल्या सुरेश गौतम, शब्बीर खान, मायाराम घसीटे व चालक मोहम्मद सावंत यांना दरीतून बाहेर काढण्यात आले.

ठळक मुद्दे जखमींवर संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो थेट दरीत जाऊन कोसळला

देवरूख (रत्नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर रामकुंड येथील अवघड वळणाजवळ पिकअप टेम्पो दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी ७.४५ वाजण्याच्या दरम्याने घडली. या अपघातात ४ जण जखमी झाले असून, जखमींवर संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.मोहम्मद अक्रम सावंत (४०, रा. गोवंडी, मुंबई) हा आपल्या ताब्यातील पिकअप टेम्पो घेऊन गोवा ते मुंबई असा प्रवास करीत होता. हा टेम्पो संगमेश्वर येथील रामकुंड येथे आला असता चालक मोहम्मद याचे वाहनावरील नियंत्रण सुटले व टेम्पो थेट दरीत जाऊन कोसळला.हा अपघात घडला तेव्हा संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंबरीश आगाशे हे ग्रामीण रूग्णालयात येत होते. त्यांनी तत्काळ जगदगुरू नरेंद्र महाराज संस्थानच्या रूग्णवाहिकेचे चालक प्रसाद सप्रे व १०८ रूग्णवाहिकेशी संपर्क साधला. त्यानंतर डॉ. आगाशे, सपे्र व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमी झालेल्या सुरेश गौतम, शब्बीर खान, मायाराम घसीटे व चालक मोहम्मद सावंत यांना दरीतून बाहेर काढण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात