रत्नागिरी : शहरात अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत राबवण्यात आलेल्या या मोहिमेत जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरातून ३० ग्रॅम वजनाचे ब्राउन हेरॉईन सदृश्य अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत चाैघांना ताब्यात घेण्यात आले आहे.पोलिस अधीक्षक नितीन बगाटे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सायंकाळी शहर परिसरात गस्त घालत होते. यादरम्यान ही कारवाई करण्यात आली.या कारवाईत ताहीर रफीक कोतवडेकर (वय ३०, रा. थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी, रिझवान अश्रफ नावडे (रा. राजीवडा, रत्नागिरी, आकीब जिक्रिया वस्ता (रा. राजीवडा, रत्नागिरी) आणि रफत करीम फणसोपकर (रा. राजीवडा, रत्नागिरी) या चौघांना ताब्यात घेतले आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक संदीप ओगले, हवालदार शांताराम झोरे, विजय आंबेकर, दीपराज पाटील, विवेक रसाळ, योगेश नार्वेकर आणि कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांच्या पथकाने केली.
Web Summary : Ratnagiri police arrested four individuals near the district hospital, seizing 30 grams of brown heroin. The operation, under 'Mission Phoenix,' was led by local crime branch officers following a patrol. The arrested individuals are residents of Ratnagiri.
Web Summary : रत्नागिरी पुलिस ने जिला अस्पताल के पास से 30 ग्राम ब्राउन हेरोइन के साथ चार लोगों को गिरफ्तार किया। 'मिशन फिनिक्स' के तहत यह कार्रवाई स्थानीय अपराध शाखा के अधिकारियों द्वारा गश्त के बाद की गई। गिरफ्तार किए गए लोग रत्नागिरी के निवासी हैं।