रत्नागिरीत उद्धवसेनेला धक्का, माजी नगरसेवक शिंदेसेनेत
By मनोज मुळ्ये | Updated: July 6, 2024 19:08 IST2024-07-06T19:05:31+5:302024-07-06T19:08:25+5:30
पालकमंत्री उदय सामंत व किरण सामंत यांनी केले स्वागत

रत्नागिरीत उद्धवसेनेला धक्का, माजी नगरसेवक शिंदेसेनेत
रत्नागिरी : शहरातील उद्धवसेनेचे माजी नगरसेवक राकेश उर्फ बाबा नागवेकर, माजी नगरसेविका मीरा पिलणकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उद्धवसेनेतून शिंदे सेनेत प्रवेश केला. राज्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत व किरण यांनी त्यांचे स्वागत केले.
पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या माध्यमातून विकासाला चालना मिळावी, त्यांच्या माध्यमातून विकासाची कामे पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा करतानाच आपल्या प्रभागाच्या आणि शहराच्या विकासासाठी ते हातभार लावतील, असा विश्वास यावेळी प्रवेश करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी केला.
राकेश उर्फ बाबा नागवेकर, मीरा पिलणकर, नितीन सुर्वे, मंदार जोशी, विक्रांत पिलनकर, मोरेश्वर मोरे, राहुल पिलनकर, महेश मोरे, शेखर भोगले, पंकज पिलनकर आदीनी यावेळी उद्धवसेनेत प्रवेश केला आहे.