शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत भाजपला धक्का बसणार?, उद्धवसेनेच्या इच्छुकांशी बाळ माने यांची गुप्त चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 13:45 IST

रत्नागिरी : गेले अनेक दिवस विरोधाचा झेंडा हाती घेतलेले भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी गुरुवारी उद्धवसेनेच्या रत्नागिरी मतदारसंघातील ...

रत्नागिरी : गेले अनेक दिवस विरोधाचा झेंडा हाती घेतलेले भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी गुरुवारी उद्धवसेनेच्या रत्नागिरी मतदारसंघातील दोन इच्छुक उमेदवारांशी बंद दाराआड चर्चा केली. त्यामुळे बाळ माने यांच्या उद्धवसेनेतील प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे.पितृपक्षात बाळ माने यांनी मातोश्रीवर भेट दिली असल्याची जोरदार चर्चा हाती. माने यांनी या वृत्ताचे खंडनही केले नाही आणि स्वीकारही केला नाही. रत्नागिरीची जागा भाजपला मिळावी, अशी मागणी त्यांनी सातत्याने केली होती. मात्र ही जागा शिंदेसेनेलाच मिळणार असल्याचे स्पष्ट होत असल्याने माने यांनी गुरुवारी उद्धवसेनेतील इच्छुक उमेदवार राजेंद्र महाडिक आणि उदय बने यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. चर्चेचा तपशील अजून जाहीर झाला नसला तरी या चर्चेमुळे माने यांच्या उद्धवसेनेतील प्रवेशाला पुष्टी मिळत आहे. उद्धवसेनेची रत्नागिरीतील इच्छुकांशी चर्चा झाल्यानंतरही उमेदवारीबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे बाळ माने हे उद्धवसेनेकडून रिंगणात उतरणार असल्याची दाट शक्यता या नव्या घडामोडींमुळे निर्माण झाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024BJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे