मुलीवर जबरदस्ती; आरोपीला सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 13:17 IST2019-06-13T13:17:22+5:302019-06-13T13:17:59+5:30
अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून जबरदस्ती करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने बुधवारी ३ वर्षे सक्तमजुरी व ३० हजार रुपये दंड ठोठावला आहे. सलमान सादीक मुजावर (२४, साखरतर, ता. रत्नागिरी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

मुलीवर जबरदस्ती; आरोपीला सक्तमजुरी
रत्नागिरी : अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून जबरदस्ती करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने बुधवारी ३ वर्षे सक्तमजुरी व ३० हजार रुपये दंड ठोठावला आहे. सलमान सादीक मुजावर (२४, साखरतर, ता. रत्नागिरी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
१५ फेब्रुवारी २०१७ रोजी साखरतर येथे शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत सलमान मुजावर याने गैरकृत्य केले होते. पीडित मुलगी घरी एकटीच असल्याचा फायदा घेत तो तिच्या घरात बेकायदा घुसला. त्याने तिच्याशी अश्लील चाळे केले व जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच याबाबत कुणाला सांगितलेस तर ठार मारून टाकण्याची धमकीही दिली होती. या प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ माजली होती.
याप्रकरणी आरोपी सलमान याच्यावर गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी नंतर त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू होती. अखेर येथील न्यायालयाने याप्रकरणी बुधवारी निकाल दिला. त्याला ३ वर्षे सक्तमजुरी तसेच ३० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. दंडाच्या रकमेतून २५ हजार रुपये पीडितेला देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.