शहरं
Join us  
Trending Stories
1
Lokmat Exclusive: ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार ९ जानेवारी २०२६; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
९ वर्षांत ७५ हजार कोटी खर्च केले तर मग विकास कुठे?: अजितदादांचा भाजपा नेत्यांना थेट सवाल
4
तू तिच्या गाडीला अपघात कर, मी तिला वाचवतो...; तरुणीला इम्प्रेस करण्याचा प्लॅन, सफलही झाला पण...
5
“स्वत:च्या भरवशावर बहुमत मिळवू; परंतु साथीदारांना सोडणार नाही”; CM फडणवीस यांचा टॉक शो
6
ठाकरेंच्या गुहेत एकनाथ शिंदे यांची कठीण परीक्षा; भाजपा मदतीने तगडे आव्हान पार केले तर...
7
आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा! रात्रीच्या अंधारात सरकारी कार्यालये ताब्यात, तेहरानने हवाई क्षेत्र बंद केले...
8
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
9
…तर अमेरिका भारतावर ५०० टक्के टॅरिफ लादणार; डोनाल्ड ट्रम्प प्रशासन धक्का देण्याच्या तयारीत
10
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
12
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
13
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
14
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
15
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
16
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
17
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
18
कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!
19
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
20
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे रत्नागिरीत सार्वजनिक, खासगी मालमत्तांचे पाच कोटींचे नुकसान, दीड महिन्यांत २८ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 17:18 IST

गेल्या दोन महिन्यात अनेकदा वादळी वा-यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याला चांगलाच तडाखा दिला आहे. या पावसामुळे आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला तर ८७ जनावरांचे बळी गेले.

रत्नागिरी  - गेल्या दोन महिन्यात अनेकदा वादळी वा-यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याला चांगलाच तडाखा दिला आहे. या पावसामुळे आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला तर ८७ जनावरांचे बळी गेले. ४८१ घरांची पडझड झाली तर ४४ गोठ्यांचे नुकसान झाले. २७ सार्वजनिक मालमत्ता तर २१ खासगी मालमत्तांचे मिळून सुमारे पाच कोटी रूपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.यावर्षी जून महिन्याच्या शेवटी पावसाला सुरूवात झाली. जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सुरू झालेला पाऊस सलग चार दिवस कायम होता. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे भरली. २ जुलै रोजी कोसळलेल्या पावसाने तिवरे धरण कोसळून त्यात २३ जणांचे बळी गेले. पुन्हा पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे यावर्षी पाऊस सरासरी पूर्ण करेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून पावसाने जोरदार बरसण्यास सुरूवात केल्याने जिल्ह्यात अनेक भागात पुराचे पाणी भरल्याने अनेक घरांचे तसेच सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. १ जून ते ४ आॅगस्ट या कालावधीत झालेल्या नैसर्गिक आपत्तींच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात पावसामुळे एकूण २८ व्यक्तींचे बळी गेले असून त्यापैकी पुरात वाहून गेलेल्या २२ व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रूपयांप्रमाणे एकूण ८८ लाख रूपयांची मदत करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ४५ कुटुंबे आणि १५२ व्यक्ती बाधित झाल्या आहेत.या कालावधीत ४८ पक्क्या व कच्च्या घरांची पूर्णत: पडझड झाली असून १२१ घरांची अंशत: पडझड झाली आहे. ३१२ कच्च्या घरांची अंशत: पडझड झाली असून ४४ गोठ्यांचे नुकसान झाले आहे. आत्तापर्यंत नुकसानासाठी ३ पक्की घरे,  १३५ अंशत: कच्ची घरे तर १० गोठ्यांना नुकसानासाठी पात्र ठरली आहेत.या पावसात ३४ मोठी दुधाळ जनावरे, ४० लहान दुधाळ जनावरे तर १३ ओढकाम करणाºया मोठ्या जनावरांचा बळी घेतला आहे. त्यापैकी आत्तापर्यंत सहा जनावरांच्या मालकांना मदत देण्यात आली आहे. या कालावधीत २७ सार्वजनिक मालमत्तेचे एकूण ४ कोटी ४५ लाख ९८ हजार ८०० रूपयांचे तर २१ खासगी मालमत्तांचे एकूण २३ लाख ५ हजार २३० असे एकूण ४ कोटी ६९ लाख ४ हजार रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.गेल्या दोन महिन्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे जिल्ह्यात पाच कोटीे रूपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्याशिवाय भातशेतीचेही नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून त्यांचे पंचनामे अजून सुरू आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस