शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

मच्छिमारांचे उद्या जेलभरो...

By admin | Updated: November 18, 2015 00:02 IST

रत्नागिरी : बेकायदा पर्ससीन, मिनी पर्ससीनमुळे पारंपरिक मासेमारी धोक्यात

रत्नागिरी : पर्ससीन व मिनी पर्ससीन मासेमारी नौका आणि पारंपरिक व ट्रॉलिंग मच्छिमारांमधील वाद चिघळला आहे. बेकायदा पर्ससीनमुळे पारंपरिक व ट्रॉलर्सद्वारे मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या बेकायदा मच्छिमारीविरोधात आवाज उठवण्यासाठी १९ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील मच्छिमार जेलभरो आंदोलन करणार आहेत. ही माहिती अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष खलील वस्ता यांनी पत्रकारपरिषदेत दिली. रत्नागिरी मत्स्य व्यवसाय खात्याच्या रत्नागिरी कार्यक्षेत्रात साडेतीनशेपेक्षा अधिक अनधिकृत पर्ससीन व मिनी पर्ससीन मच्छिमारी नौका बेकायदेशीररित्या मच्छिमारी करीत असून, त्याकडे मत्स्य व्यवसाय खात्याचे दुर्लक्ष आहे. त्याशिवाय परराज्यातील मिनी पर्ससीन मच्छिमारी नौकाही रत्नागिरीत बेकायदा मच्छिमारी करीत आहेत. पारंपरिक व ट्रॉलिंग मच्छिमारांच्या अनेक मागण्या आहेत. पारंपरिक मच्छिमार जगावा व पर्यावरण पूरक मच्छिमारी व्हावी, यासाठी शासनाने नवीन पर्ससीन नौकांना परवाने देऊ नयेत. डॉ. सोमवंशी समितीच्या अहवालातील ज्या २५ शिफारशी राज्य शासनाने स्वीकारल्या आहेत, त्याबाबत हिवाळी अधिवेशनात कायदा व्हावा व त्याची कठोर अंमलबजावणी व्हावी. सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त, रत्नागिरी व येथे अनेक वर्षे ठाण मांडून बसलेले संबंधित अधिकारी यांची तत्काळ हकालपट्टी करून कार्यक्षम अधिकारी नियुक्त करावे व बेकायदा मच्छिमारी बंद करावी, यासारख्या मागण्या संघटनेने केल्या आहेत, तर स्थानिक मच्छिमारांनी आपसात भांडून तिसऱ्याचा लाभ होऊ देऊ नये, असे निसार बोरकर यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)