चिपळुणातील हिरापन्ना बेकरीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 20:36 IST2020-03-05T20:35:30+5:302020-03-05T20:36:53+5:30
चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथील हिरापन्ना बेकरीला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी ११.१५ वाजता घडली. या आगीमुळे परिसरात धुराचे लोण पसरले आहे. १ तासाने ही आग आटोक्यात आली.

चिपळुणातील हिरापन्ना बेकरीला आग
चिपळूण : शहरातील बहादूरशेख नाका येथील हिरापन्ना बेकरीला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी ११.१५ वाजता घडली. या आगीमुळे परिसरात धुराचे लोण पसरले आहे. १ तासाने ही आग आटोक्यात आली.
वर्षभरापूर्वी याच बहादूरशेखनाका येथील क्वालिटी बेकरीला आग लागून लाखोंचे नुकसान झाले होते. अगदी त्याच प्रकारे येथील हिरापन्ना बेकरीला आग लागली असून, या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. बहादूर शेखनाका येथे नेहमीच वर्दळ असते.
या घटनेमुळे मोठी गर्दी झाल्याने महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच नगर परिषदचे दोन अग्निशमन दलाचे बंब व पाण्याचा टँकर घटनास्थळी दाखल झाले होते.
ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. आग अजून भडकू नये यासाठी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. १ तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. ही आग शॉर्टसक्रिटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.