Ratnagiri: लोटेत रासायनिक कंपनीला आग, लाखोंची वित्तहानी; दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश

By अरुण आडिवरेकर | Updated: October 9, 2023 18:57 IST2023-10-09T18:56:33+5:302023-10-09T18:57:08+5:30

ऑक्टोबर हिटमुळे रसायनाने पेट घेतला असावा असा अंदाज

Fire at Lotte Chemical Company, financial loss of lakhs | Ratnagiri: लोटेत रासायनिक कंपनीला आग, लाखोंची वित्तहानी; दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश

Ratnagiri: लोटेत रासायनिक कंपनीला आग, लाखोंची वित्तहानी; दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश

आवाशी : खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील स्पेक्टर केमिकल प्रा. लि. या रासायनिक कंपनीला आग लागून लाखाेचे नुकसान झाल्याची घटना साेमवारी (९ ऑक्टाेबर) दुपारी १२:३० वाजण्याच्या दरम्यान घडली. या आगीत कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, तब्बल दोन तासांनी ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.

लाेटेतील स्पेक्टर केमिकल कंपनी साेमवार असल्याने बंद हाेती. तसेच सोमवार असल्याने महावितरणचा विद्युत पुरवठाही बंद होता. मात्र, कंपनीबाहेर उघड्यावर असणाऱ्या रासायनिक ड्रममधील पदार्थाने अचानक पेट घेतला. त्यानंतर बाजूच्या सर्वच ड्रमना आगीचा वेढा पडला आणि क्षणार्थात आगीने राैद्ररूप घेतले. ऑक्टोबर हिटमुळे रसायनाने पेट घेतला असावा असा अंदाज व्यक्त केला गेला.

आगीचे वृत्त कळताच वसाहतीतील अग्निशमन दल, खेड नगर परिषदेचा बंब, परिसरातील खासगी पाण्याचे टँकर यांच्या मदतीने दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत कंपनीतील यंत्र सामुग्री व इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच लोटे पोलिस दूरक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

Web Title: Fire at Lotte Chemical Company, financial loss of lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.